राज्यसभा निवडणूक : पवारांची इच्छा असेल तर दोन जागा नक्कीच मिळतील

Update: 2024-02-14 13:26 GMT

राज्यसभा निवडणुकीच्या तोंडावर अशोक चव्हाण यांना भाजपमध्ये प्रवेश देऊन भाजपने काँगेसची कोंडी केली आहे. रिक्त होणाऱ्या ६ जागांपैकी २ जागा भाजप, १ - १ जागा प्रत्येकी अजित पवार व शिंदे गट सहज जिंकू शकतात. तर काँगेस एक जागा. पण ती ही काँग्रेसला मिळू द्यायची नाही, अशी रणनीती भाजपची असणार आहे. त्यामुळे लढाई पाचव्या व सहाव्या जागेसाठी होणार आहे. एकही जागा काँगेस व अन्य विरोधकांना मिळू नये, यासाठी अशोक चव्हाणांचा पक्ष प्रवेश आहे. भाजपच्या दोन जागा सहज निवडूण येत असून तिसऱ्या जागेसाठी त्यांना १९ मतांची गरज आहे. अशोक चव्हाण यांच्या हालचालींवर काँगेस पक्षांने करडी नजर ठेवली नाही, तर काँग्रेसलाच फोडून ते १९ मते मिळवू शकतात. भाजपचा हाच प्लॅन असल्याने निवडणुकीच्या तोंडावर हा पक्ष प्रवेश झाला आहे. अन् विशेष म्हणजे यात भाजपला यश आले तर ते सहाव्या जागेसाठी ही घोडेबाजार करतील, हे मविआने समजून घेतले पाहिजे.

राज्यसभेच्या या सहा पैकी सहा ही जागा जिंकून मविआच्या हाती भोपळा देण्याचा प्लॅन भाजपचा असणार आहे. त्या दृष्टीने त्यांची रणनिती असणार आहे. ही सहावी जागा काँगेस पक्षाच्या वाट्याला आली असल्याने किमान ही जागा तरी मिळविण्याची रणनिती काँगेसने आखली पाहिजे. अन् भाजप लढवित असलेल्या तिसऱ्या जागेवर डोळा ठेवला पाहिजे. तिसऱ्या जागेसाठी भाजपला कमी असलेली १९ मतं मिळू दिली नाहीत तर भाजपचा तो फार मोठा पराभव असेल. लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर भाजपचा हा पराभव इंडिया आघाडीला बळ देवुन जाईल. अन् राज्यातील राजकारणाला वेगळी दिशा देण्यासाठी तिसऱ्या जागेवरील भाजपचा पराभव खूपच गरजेचा आहे.

काँग्रेसकडे सध्या 44 आमदार आहेत. त्यामुळे आवश्यक असलेली 41 मतं मिळवून त्यांच्याकडे 3 मतं शिल्लक राहतात. तर शरद पवार गटाची 11, उद्धव ठाकरे गटाची 16, समाजवादी पक्षाची 2, एमआयएमची 2, सीपीएम 1, राजू शेट्टी 2, ही एकूण 37 मतं मविआ उमेदवाराला मिळू शकतात. हितेंद्र ठाकूर यांच्याकडे असलेले 3 व प्रहारकडे असलेली 2 मतं या निवडणुकीत निर्णायक ठरु शकतात. त्यामुळें आपल्या पक्षातील मतं फुटू नयेत याची खबरदारी घेण्याबरोबरच ही निर्णायक पाच मतं मिळविण्याचा प्रयत्न मविआने केला पाहिजे. मविआकडे शरद पवार यांच्यासारखा अनुभवी नेता आहे. त्यांनी ठरविले व मुख्य म्हणजे त्यांची इच्छाशक्ती असेल तर मविआ दोन जागा जिंकू शकते. पण शरद पवारांची इच्छा असली पाहिजे. अन् ती नसली तर हमखास एक मिळणारी जागा ही मिळणार नाही. हे तितकेच खरे.

राहुल गायकवाड,

मो. 9967380268

Tags:    

Similar News