मग का शेण खाल्लं, राज ठाकरे यांचा उद्धव ठाकरे यांना टोला...

राज ठाकरे यांनी गुढीपाडव्याच्या सभेतून थेट उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार टीका केली.;

Update: 2023-03-22 17:17 GMT

राज ठाकरे यांच्या गुढी पाडIव्याच्या सभे कडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले होते. या सभेत बोलताना राज ठाकरे यांनी उद्धव ठाकरे यांच्या वर जोरदार टीका केली. यावेळी बोलताना राज ठाकरे यांनी २०१९ च्या निवडणुकीपूर्वी भाजप शिवशेनेच्या झालेल्या युती संदर्भात भाष्य केले. या मध्ये राज ठाकरे म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहा जेव्हा देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असतील असं म्हणाले होते, त्यावेळी गप्प का बसले ? त्या नंतर उद्धव ठाकरे यांनी राष्ट्रवादी आणि काँग्रेस सोबत केलेल्या आघाडीवर बोलताना मग का शेण खाल्ले असा थेट सवाल उद्धव ठाकरे यांना केला.

गेल्या दोन वर्षांपासून आपण महाराष्ट्रातली राजकीय स्थिती पाहतो आहे. गेल्या काही दिवसांमध्ये राजकारणाचा खेळ, बट्याबोळ सर्वच पाहतो आहे. हे सगळं राजकारण पाहात असताना मला वाईट वाटत होतं पण ज्यावेळेला शिवसेना आणि धनुष्यबाण हे तुझं का माझं की तुझं की माझं तेव्हा वेदना होत होत्या. लहानपणापासून मी तो पक्ष पाहात आलो, तो पक्ष जगलो. मी दुसरीत होतो तेव्हा माझ्या शर्टवर वाघ असायचा. मुख्यमंत्री लक्षात असूद्यात तुमच्या कडे शिवसेना हे नाव आहे. आधी तर मशिदहिंवरचे भोंगे बंद करा. आणि त्याच बरोबर सातारा हजार मनसैनिकांवर झालेले गुन्हे मागे करा. मुळात एकतर तुम्ही ठाम पणे सांगा कि लाऊड स्पीकर बंद करा. मग तुमच्या म्हणण्या नुसार आम्ही स्पिकर बंद करतो. या दोन्ही पर्यायांपैकी शिंदे सरकारला एक निर्णय घ्यावाच लागेल. अजून पर्यटनट मी विषय सोडलेला नाहीये, मी मुळात मुद्दाम विषय काढला नाही. खरंतर मी मुख्यमंत्र्यांना सांगू इच्छितो महाराष्ट्रातील गोष्टींकडे लक्ष द्या. मी राजकारण लहान असल्यापासून पाहात आलो. अनुभवत आलो. असंख्य लोकांनी शिवसेना उभी केली, अनेक लोकांच्या कष्टातून संघटना उभी केली. मी जेव्हा त्या पक्षातून बाहेर पडलो आणि त्या पक्षातून बाहेर पडल्यानंतर मी इथे जेव्हा भाषण केलं होतं तेव्हा मी म्हटलं होतं की माझा वाद माझ्या विठ्ठलाशी नाही तर आजूबाजूच्या बडव्यांशी आहे. मी तेव्हा हेदेखील म्हटलं होतं की हीच चार टाळकी हा पक्ष खड्ड्यात घालणार. खड्ड्यात पक्ष घातल्यानंतर त्याचा वाटेकरी व्हायची माझी इच्छा नाही म्हणून मी पक्ष सोडतोय. आजची ही परिस्थिती पाहिल्यावर टेलिव्हिजन सीरिज असतात त्यात रिकॅप येतो. २००६ मध्ये जेव्हा मी पक्ष स्थापन केला तेव्हा तो याच शिवतीर्थावर केला. मात्र त्या भाषणात काय झालं कशामुळे झालं तो चिखल करायचा नव्हता आजही करायाचा नाही. मात्र काही गोष्टी पसरवल्या गेल्या. राज ठाकरेला शिवसेनापक्षप्रमुख पद हवं होतं. राजला मिळालं नाही म्हणून तो बाहेर पडला. माझ्या स्वप्नातही हा विचार आला नव्हता.

जमलेल्या माझ्या तमाम हिंदू बांधवांनो-भगिनींनो आणि मातांनो.. सर्वप्रथम मी आपणा सर्वांना गुढीपाडव्याच्या मनःपूर्वक शुभेच्छा देतो. बऱ्याच काळानंतर बोलतो आहे. अनेकांनी काल विचारलं एवढे मोठे स्क्रिन कशासाठी लावले आहेत? म्हटलं भाषण संपल्यावर पठाण दाखवणार आहेत. काहीतरी उद्देश आहे म्हणूनच लावलेत ना? आज शिवतीर्थाचा कोपरा अन् कोपरा भरलेला दिसतो आहे. अनेकजण बोलले की हा संपलेला पक्ष आहे जरा बघा हा संपलेला पक्ष आहे का? जे बोलले त्यांची अवस्था काय झाली? असाही प्रश्न राज ठाकरेंनी विचारला आहे. मला फक्त प्रचाराला बाहेर काढू नका.उध्दव ठाकरेंला घेऊन ओबेरायला गेला होतो. मी उध्दवशी बोललो. "शिवसेनेचं धनुष्य बाळासाहेब ठाकरे सोडून कुणालाच पेलवणार नाही माहित होतं" शिवसेनेचं धनुष्यबाण हे शिवधनुष्य होतं. ते बाळासाहेब ठाकरे सोडून इतर कुणालाही पेलणार नाही मला माहित होतं. एकाला झेपलं नाही दुसऱ्याला बघा आता झेपतं आहे का? आत्ताच त्यांच्या बाजूच्या लोकांनाही सांगतो माझं बोलणं झाल्यावर उद्या तोंड उचकटू नका कारण नंतर मी जे काही बोलेन त्यामुळे तोंड लपवावं लागेल. सगळ्यांना तो महाबळेश्वरचा प्रसंग आठवतो. पण त्याआधीही अनेक गोष्टी घडल्या. हे मी सांगतोय कारण आत्ताची परिस्थिती तुम्हाला समजेल.

नारायण राणे शिवसेनेतून जाणार नव्हते. मला बाळासाहेब बोललो... नारायण राणेंना बोलवू नका. लोकांना बाहेर काढण्याच्या राजकारणाचा शेवट असा झालाय. मी एके दिवशी उद्धवसोबत हॉटेल ओबेरॉयला गेलो. तिथे मी त्याला बसवलो. मी हे जे सांगतोय ते शिवछत्रपतींची शपथ घेऊन सांगतो आहे. मी उद्धवला बसवलं आणि विचारलं की तुला काय हवं आहे? तुला पक्षाचा प्रमुख व्हायचं आहे? हो. तुला मुख्यमंत्री व्हायचं आहे सत्ता आल्यावर हो. मला फक्त सांग की माझं काम काय? मला फक्त प्रचाराला बाहेर काढू नकोस. २०१९ ची निवडणूक संपून आकडेवारी आली. त्या निवडणुकीत तुम्ही अडीच वर्षाचं मुख्यमंत्रीपदाबद्दल बोलला होतात ? चार भींतीत म्हणे अमित शाह यांनी सांगितलं. तुम्ही जाहीर पणे का नाही सांगत ? नरेंद्र मोदी. देवेंद्र फडणवीस यांची मुख्यमंत्रीपदी निवड झाल्यावर तक्रार का केली नाही, असा सवाल अमित शहा यांनी केला होता. ज्यावेळेला यांचं सरकार बनत नाही ते पाहिलं तेव्हा मुख्यमंत्रीपदाची मागणी केली. त्यांनी ज्या उमेदवारांच्या विरोधात निवडणूक लढवली त्यांच्यासोबत सरकार स्थापन केले. अजित पवार यांनी यापूर्वीच भाजपची शपथ घेतली होती. डोळे वटारले. मग प्रेम प्रकरण नेस्तारलं. हा सगळा प्रकार करण्यासाठी तुम्ही मतदान करता का ? मागच्या गुढीपाड्व्याच्या सभेत बोलालो आणि जून मध्ये राडा झाला. म्हणजेच अलीबाबा आणि त्यांचे ४० चोर, मुळात चोर म्हणता येणार नाही. कारण ते चोर नाही.

कोरोना काळात मुख्यमंत्री कोणाला भेटत न्हवते आणि अचानक बाहेर पडले. का तर 21 जून रोजी आमदारासोबत एकनाथ शिदे गुवाहाटीला गेल्याचे समोर आले. त्या नंतर सुरतला गेले. सुरत महाराजांनी महाराष्ट्रात प्रयाण केले. महाराष्ट्रातून लूट करून सुरतला जाणारा हा पहिला माणूस होता. एकनाथ शिंदे, मला फक्त एवढंच सांगायचं आहे की तुम्ही महाराष्ट्राचे मुख्यमंत्रिपदावर असल्याने तुम्ही महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करावे. महाराष्ट्राच्या हिताचं बघा. उद्धव ठाकरे ज्या ठिकाणी भेटतील त्याच ठिकाणी सभा घेतील त्या ठिकाणी तुम्ही पण मागे मागे जाऊ नका. महाराष्ट्राचं काय? महाराष्ट्रात अनेक प्रश्न आहेत. पेन्शनचा विषय मिटवून टाका. शेतकऱ्याचा विषय आहे. त्यांच्या प्रश्नांवर जोर द्या. अवकाळी पावसाने शेतकऱ्यांचे नुकसान केले आहे. त्यांना भेटा. सभा कसल्या घेताय.

सध्या सुशोभीकरणाचे काम सुरू आहे. त्यांना भेटा. सभा कसल्या घेताय. रात्रीच्या वेळी रस्त्यावर डान्सबार उघडे आहे असं वाटतं. असं सुशोभीकरण असत. का कुठे? तुम्ही जगाचा प्रवास करता तेव्हा किती स्वच्छ शहरे आहेत ते पहा. सुशोभीकरणाच्या नावावर 1700 कोटी रुपये खर्च करण्यात आले. त्याने कायमचा फायदा झालाय का? ते जाणार मग परत आपण ते खर्च करून लावणार. आपण कोण आहोत, अरे? आपण महाराष्ट्राचे नागरिक आहोत. महाराष्ट्राचे प्रबोधन करण्याची वेळ आली आहे .आज हे गेले उद्या ते आले, उद्या ते गेले मग हे आले.. हे अश्या प्रकारचं राजकारण महाराष्ट्रात बघतोय ? अश्याने नवीन उद्योग उदयास येणार नाही. महिला शेतकऱ्यांनी सरकार कडे बघत आहेत. आणि सरकार न्यायालयाकडे बघत आहेत. न्यायालयांवर इतके अवलंबून राहिलेले सरकार मी कधीच पाहिले नाही.

मला जावेद अख्तर यांच्यासारखे मुस्लिम हवेत. त्यांनी पाकिस्तानात जाऊन सांगितलं की आमच्या शहरावर जो हल्ला झाला तो आम्ही विसरणार नाही. मला असे मुस्लिम लोक हवे आहेत. असंही राज ठाकरेंनी म्हटलं आहे.मशिदीवरचे लाऊडस्पिकर बंद करा. नाहीतर आमच्याकडे दुर्लक्ष करा आम्ही मशिदीचे लाऊडस्पीकर काढणार. १७ हजार मनसैनिकांवर गुन्हे दाखल केलेत ते मागे घ्या. मी मुख्यमंत्र्यांना भेटणार आहे. मशिदींवरचे भोंगे सरकारने बंद करावेत नाहीतर आमच्याकडे दुर्लक्ष करा. सांगलीतल्या खेळाच्या मैदानावर कसं अतिक्रमण आहे त्याबद्दलचं पत्रच राज ठाकरेंनी वाचून दाखवलं. अफझल खानाची कबर आणि त्याभोवतीचं अतिक्रमण मुख्यमंत्र्यांनी हटवलं. आज मी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना सांगू इच्छितो तुम्हाला शिवसेना नाव मिळालं आहे. चिन्ह मिळालं आहे.

गेल्या वर्षी भोंग्यांचं आंदोलन झालं त्यावेळी मनसेच्या १७ हजार लोकांवर गुन्हे दाखल झाले आहेत ते गुन्हे मागे घ्या. आता मशिदींवरचे भोंगे परत वाजू लागले आहेत. एक तर तुम्ही ते बंद करा किंवा मग आम्ही काय करतो आहे त्याकडे दुर्लक्ष करा आम्ही आमच्या पद्धतीने हे भोंगे बंद करू.सांगलीतल्या या गोष्टीकडे लक्ष द्या.


राज ठाकरेंनी दाखवलं समुद्रातलं ड्रोन शूट, मी मध्यंतरी एका भागात गेलो होतो. मला तेव्हा समुद्रात लोक दिसले. मला काय आहे ते समजेना. मी एकाला सांगितलं जरा बघ काय आहे ते. त्यावेळी मला त्या माणसाने ड्रोन फिरतात ना त्यातून शूट करून माझ्याकडे काही क्लिप्स आणल्या. प्रशासनाचं दुर्लक्ष झालं की काय होतं बघा. प्रशासनाकडे लक्ष नसलं की कसं होतं बघा. देशाची घटना मानणारा जो मुस्लिम आहेत त्यांनाही माझा प्रश्न आहे की आत्ता मी जे तुम्हाला दाखवणार आहे ते तुम्हाला मान्य आहे का?

राज ठाकरेंनी एक व्हिडीओ दाखवला. मी हे दाखवण्यापूर्वी माझा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस, मुंबईचे आयुक्त इक्बालसिंह चहल यांना सगळ्यांनाच विनंती आहे की कारवाई होत नसेल तर महिन्याभराने काय होईल ते मी सांगतो. माहिमच्या समुद्रात दुसरं हाजी अली उभारलं जातंय लक्ष आहे का ? समुद्रात मकदुम बाबा दर्गा उभा केला आहे. माहिम पोलीस स्टेशन तिथे जवळ आहे. लक्षनाही. महापालिकेचे लोक फिरत असतात त्यांनी पाहिलं नाही. हे नवीन हाजी अली तयार करण्याचा प्रयत्न होतो आहे. आता प्रशासनाला, मुख्यमंत्र्यांना, उपमुख्यमंत्र्यांना, पोलीस आयुक्तांना, महापालिका आयुक्तांनी मी आजच सांगतो की महिन्याभरात कारवाई झाली नाही त्याच्या बाजूला सर्वात मोठं गणपतीचं मंदिर उभं केल्याशिवाय आम्ही राहणार नाही मग काय व्हायचं ते होऊ देत.

Tags:    

Similar News