राज ठाकरे यांच्या पंतप्रधान मोदींकडे तीन मागण्या
राज ठाकरे यांनी अयोध्या दौरा स्थगीत केल्यानंतर पुण्यातील सभेत राज ठाकरे यांचा निशाणा कुणावर असणार अशी चर्चा रंगली होती. मात्र राज ठाकरे यांनी पुण्यातील सभेत पंतप्रधान मोदी यांना तीन विनंत्या केल्या आहेत. पाहुयात त्या कोणत्या आहेत.;
राज ठाकरे यांनी पुण्यात घेतलेल्या पत्रकार परिषदेत 5 जून रोजी अयोध्या दौरा करणार असल्याचे जाहीर केले होते. मात्र ऐनवेळी राज ठाकरे यांनी अयोध्या दौरा स्थगीत केल्यानंतर राज ठाकरे कोणावर निशाणा साधणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. मात्र राज ठाकरे यांनी पुण्यात बोलताना मुख्यंत्री उध्दव ठाकरे यांचा समाचार घेतानाच थेट पंतप्रधान मोदी यांच्याकडे तीन विनंत्या केल्या आहेत.
राज ठाकरे पुण्यात बोलताना म्हणाले की, उध्दव ठाकरे म्हणतात औरंगाबादला मी संभाजीनगर म्हणतो. मग कशाला नाव बदलायला हवे. त्यावर बोलताना राज ठाकरे म्हणाले, तु कोण आहे, महात्मा गांधी, सरदार पटेल, लाल बहादुर शास्री आहेत का? असा सवाल केला. तर यावेळी बोलताना राज ठाकरे म्हणाले की, माझ्या पंतप्रधान मोदी यांना तीन विनंत्या आहेत. त्यांनी संपुर्ण देशात समान नागरी कायदा लागू करावा, देशातील लोकसंख्येवर नियंत्रण आणण्यासाठी विशेष कायदा करावा, तसेच औरंगाबादचे नाव संभाजीनगर करावे, अशी विनंती राज ठाकरे यांनी पंतप्रधान मोदी यांना केली आहे.
राज ठाकरे यांनी यावेळी ओवैसी यांच्यावरही निशाणा साधला. राज ठाकरे म्हणाले की, हिंदूत्वावरून स्पर्धा सुरू झाली आहे. मात्र ओवैसी औरंगजेबाच्या कबरीवर माथा टेकवतो. तरी हे सरकार त्यांच्यावर कारवाई करत नाही. मात्र महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांवर कारवाई केली जात आहे. तर शरद पवार हे औरंगजेबाला सुफी संत असे म्हणतात, असे वक्तव्य राज ठाकरे यांनी केले.