मनसेचं इंजिन भाजपच्या रुळावर?
संपुर्ण राज्याचे लक्ष लागलेल्या मनसेच्या गुढीपाडवा मेळाव्यात राज ठाकरे कोणत्या मुद्द्यावर बोलणार याबाबत तर्क वितर्क लावले जात होते. मात्र या मेळाव्यात बेरोजगारी, महागाई यासारख्या मुद्द्यावर कोणतेही भाष्य केले नाही. मात्र राज ठाकरे यांनी मनसेच्या मेळाव्यातून भाजपचा अजेंडा उचललेला पहायला मिळाला.;
संपुर्ण राज्याचे लक्ष लागलेल्या मनसेच्या गुढीपाडवा मेळाव्यात राज ठाकरे कोणत्या मुद्द्यावर बोलणार याबाबत तर्क वितर्क लावले जात होते. मात्र या मेळाव्यात बेरोजगारी, महागाई यासारख्या मुद्द्यावर कोणतेही भाष्य केले नाही. मात्र राज ठाकरे यांनी मनसेच्या मेळाव्यातून भाजपचा अजेंडा उचललेला पहायला मिळाला.
राज ठाकरे यांच्या गुढीपाडवा मेळाव्याकडे संपुर्ण राज्याचे लक्ष लागले होते. त्यामुळे या मेळाव्यात राज ठाकरे कोणत्या मुद्द्यावर बोलणार याची चर्चा सुरू होती. मात्र राज ठाकरे यांनी महागाई, बेरोजगारी यासारख्या मुलभुत विषयांबद्दल अवाक्षरही न काढता भाजपचा अजेंडा रेटण्याचे काम केले.
मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी आज छत्रपती शिवाजी महाराज पार्क वर केलेल्या भाषणात भाजपची स्क्रीप्ट वाचली. मराठी अस्मिता, राज्य सरकारचा भ्रष्टाचार, भाजपला शिवसेनेने दिलेला धोका, मशिदीवरचे भोंगे अशा भाजपच्या प्रचाराची स्क्रीप्ट आज राज ठाकरे यांनी नव्याने वाचली. महागाई, वाढता द्वेषभाव यावर राज ठाकरे यांनी चकार शब्द काढला नाही. जनता महागाईच्या आगीत होरपळत असतानाही त्यांनी मोदी सरकार वर मौन बाळगलं मात्र राष्ट्रवादी काँग्रेसच्या जन्मानंतर जातीयवाद वाढल्याचं निरीक्षण जोरदार पणे नोंदवलं.
पहाटेचा शपथविधी बद्दल बोलताना त्यांनी अजित पवारांची खिल्ली उडवली मात्र माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याबद्दल एक वाक्यही राज ठाकरे बोलले नाहीत. सत्तेच्या समसमान वाटपाच्या मुद्द्यावरून राज ठाकरे यांनी शिवसेनेवर हल्ला चढवला. अडीच वर्षे मुख्यमंत्री पदाची डील निकालानंतरच कशी आठवली, आणि महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदाची चर्चा बंद दाराआड का झाली असा सवाल राज ठाकरे यांनी विचारला आहे. मुंबईमध्ये एकही प्लॉट ठाकरे स्मारकासाठी सापडला नाही, त्यांना पसंत पडला म्हणून महापौर बंगला त्यांनी घेतला अशी थेट टिका ही राज ठाकरे यांनी केली आहे.