राज ठाकरेंमुळे तरुणाच्या जीवाला धोका ?

पिंपरी चिंचवडमधील एका तरुण सामाजिक कार्यकर्त्याने आज पिंपरी न्यायालयात खाजगी तक्रार दाखल केली असून, मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या शिवाजी पार्क, दादर (पश्चिम), मुंबई येथे झालेल्या गुढीपाडव्याच्या मेळाव्यातील राज ठाकरे यांचं भाषण हे धार्मिक वाद निर्माण करणारं आणि दंगल भडकवणारी होतं त्यामुळे राज ठाकरे यांच्या विरुद्ध कायदेशीर कारवाईची मागणी या तरुणाने केली आहे.;

Update: 2023-03-24 04:39 GMT

पिंपरी चिंचवडमधील एका तरुण सामाजिक कार्यकर्त्याने आज पिंपरी न्यायालयात खाजगी तक्रार दाखल केली असून, मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या शिवाजी पार्क, दादर (पश्चिम), मुंबई येथे झालेल्या गुढीपाडव्याच्या मेळाव्यातील राज ठाकरे यांचं भाषण हे धार्मिक वाद निर्माण करणारं आणि दंगल भडकवणारी होतं त्यामुळे राज ठाकरे यांच्या विरुद्ध कायदेशीर कारवाईची मागणी या तरुणाने केली आहे.

राज यांच्याशी झालेल्या या भाषणानंतर वाकड येथील वाजिद रज्जाक सय्यद यांनी काल वाकड पोलीस ठाण्यात राजविरोधात रीतसर तक्रार दाखल केली आहे. परंतु, पोलिसांनी त्याकडे लक्ष न दिल्याने त्यांनी अॅड. वाजेदखान बिडकर यांच्यामार्फत पिंपरी न्यायालयात खासगी तक्रार दाखल करण्यात आली.

राज ठाकरे यांनी आपल्या भाषणात माहीम (पश्चिम) मुंबई समुद्रकिनारी असलेल्या बेकायदेशीर दर्ग्याचा उल्लेख केला होता. तक्रारीत असा दावा केला की राज यांना वाटते की तो राज्यात दंगली भडकावू शकतात. राज ठाकरे यांना फक्त मुस्लिमांचीच अनधिकृत बांधकामे आणि भोंगे दिसतात.

पोलीस आणि न्यायालयीन खटल्यातील त्यांच्या दाव्यानुसार राज ठाकरे यांनी हिंदू आणि मुस्लिमांमध्ये धार्मिक वाद निर्माण केला आहे. राज ठाकरे यांनी असे भाषण केले ज्यामुळे मुस्लिम आणि हिंदूंमध्ये तणाव निर्माण होईल आणि रमजानच्या पवित्र महिन्यात अशांतता निर्माण होईल.

केवळ महाराष्ट्रातच नव्हे, तर बिहारसारख्या अन्य राज्यातही असे धार्मिक विधाने केल्याप्रकरणी त्यांच्यावर कारवाई करण्यात आल्याची माहिती न्यायालयाला देण्यात आली आहे. त्यामुळे त्यांच्या मेळाव्यावर बंदी घालण्याची मागणी केली आहे. या तक्रारीनंतर माझ्या जीवाचे काही बरेवाईट झाल्यास त्याला राज ठाकरे हेच जबाबदार असतील, असे सय्यद यांनी शेवटी तक्रारीत म्हटले आहे.  

Tags:    

Similar News