राज ठाकरे भाजपचा नवा भोंगा, संजय राऊत यांचा हल्लाबोल
राज ठाकरे यांनी केलेल्या टीकेवर संजय राऊत यांनी प्रत्युत्तर दिले.;
राज ठाकरे यांनी गुढीपाडवा मेळाव्यात केलेल्या भाषणावरून (Raj Thackeray speech) झालेल्या टीकेला उत्तर देण्यासाठी राज ठाकरे यांनी उत्तर सभा आयोजित केली होती. यावेळी त्यांनी संजय राऊत यांचा लवंडे असा उल्लेख करत त्यांच्यावर टीका केली. त्यावरून राज ठाकरे हे भाजपचे नवे भोंगे असल्याची टीका संजय राऊत यांनी केली. (Sanjay raut criticize to Raj Thackeray)
संजय राऊत म्हणाले, राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी ईडीच्या कारवायांना न घाबरता किरीट सोमय्या विरोधातल्या आरोपांवर शिवसेनेला पाठींबा दिला असता तर त्यांच्यातील मराठी बाणा दिसला असता. परंतू ते सध्या भाजपचा भोंगा झाले आहेत. कारण भाजपने वाजवलेल्या भोंग्यांच्या महाविकास आघाडीवर कोणताही परिणाम झाला नाही. त्यामुळे भाजपने राज ठाकरे यांना भोंगा बनवले आहे. (Sanjay raut on ED and BJP)
पुढे बोलताना संजय राऊत म्हणाले, मी शिवराळ भाषा वापरली आहे. त्याचे मी समर्थन करतो. कारण किरीट सोमय्या याने INS विक्रांतच्या माध्यमातून मोठ्या देशाच्या संरक्षण क्षेत्राशी आणि देशभावनेशी प्रतारणा केली आहे. त्यामुळे महाराष्ट्रद्रोही किरीट सोमय्या यांच्याविरोधात मी दिलेल्या शिवीचे मी आणि शिवसेना पक्ष समर्थन करतो, असे मत व्यक्त केले. (Sanjay raut on kirit somaiya)
तसेच किरीट सोमय्या आणि त्यांच्या जवळचे बिल्डर यांनी मुंबईला महाराष्ट्रापासून तोडण्यासाठी केंद्रीय गृहमंत्रालयाला प्रेझेंटेशन दिले आहे. त्या किरीट सोमय्याला शिवतिर्थवर बोलवून त्याचा सत्कार करा, असा टोला संजय राऊत यांनी राज ठाकरे यांना लगावला.तसेच मराठी माणसांविषयी भाष्य करताना मनसेने शिवसेनेला पाठींबा द्यायला हवा, असे मत संजय राऊत यांनी व्यक्त केले.
किरीट सोमय्या यांनी मराठी भाषेला विरोध केला होता. मात्र तरीही मनसेने किरीट सोमय्यांचे समर्थन करावे, हे कितपत योग्य आहे. त्यामुळे जर त्यांना वाटत असले तर त्यांनी खासगी स्तरावर किरीट सोमय्या यांना एखाद्या भुषण पुरस्कार द्यावा.
ED च्या कारवाईत अभय मिळाल्यामुळे भोंगा वाजत आहे.
संजय राऊत पुढे म्हणाले की, केंद्र सरकारकडून त्यांना ईडीच्या कारवाईत अभय मिळाल्यामुळेच हा भोंगा वाजत असल्याची टीका केली. तसेच निराशेतून अशा प्रकारचे भोंगे वाजत आहेत, असा टोला संजय राऊत यांनी लगावला.