Raj Thackeray : उध्दव ठाकरे यांच्या अंगावर आंदोलनाची एकतरी केस आहे का?
राज ठाकरे यांनी अयोध्या दौऱ्याला स्थगिती दिल्यानंतर राज ठाकरे पुणे येथील सभेत काय बोलणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. त्यातच राज ठाकरे यांनी पुणे येथे बोलताना थेट उध्दव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे.;
राज ठाकरे यांनी अयोध्या दौरा स्थगित केल्यानंतर पुण्यातील सभेत काय बोलणार याकडे संपुर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले होते. तर मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी मुंबईत झालेल्या सभेत राज ठाकरे यांच्यावर टीका केली होती. तर त्यांचे हिंदूत्व नकली असल्याचे म्हटले होते. त्याचा राज ठाकरे यांनी पुण्यातील सभेत समाचार घेतला.
राज ठाकरे म्हणाले की, आंदोलनं अर्ध्यात सोडले असल्याचा आरोप मनसेवर केला जातो. मात्र आम्ही कोणतं आंदोलन अर्ध्यात सोडलं असा सवाल राज ठाकरे यांनी केला. तसेच उत्तर भारतीयांना रेल्वे भरती परीक्षेसंदर्भात विचारणा करायला गेल्यानंतर त्या मुलाने पदाधिकाऱ्याला शिवी दिली. त्यामुळे उत्तर भारतीयांच्या विरोधात मनसे कार्यकर्त्यांनी आंदोलन केले. तसेच या ममता बॅनर्जी रेल्वेमंत्री असताना स्थानिक भाषेत रेल्वेची परीक्षा घेण्याची घोषणा केली. हे मनसेच्या आंदलोनाचे यश असल्याचे राज ठाकरे म्हणाले.
राज ठाकरे पुढे म्हणाले की, आम्ही टोलविरोधात आंदोलन केले. राज्यातील 65 टोलनाके बंद झाले. मशिदीवरील भोंग्यांविरोधात आंदोलन केले. अनेक मशिदीवरील भोग्यांचे आवाज बंद किंवा कमी झाले. त्याबरोबरच आम्ही अनेक आंदोलनं करून अंगावर केस घेतल्या. मात्र उध्दव ठाकरे यांच्या अंगावर आंदोलनाची एकतरी केस आहे का? असा सवाल राज ठाकरे यांनी थेट उध्दव ठाकरे यांना केला.
तु महात्मा गांधी आहे का?
राज ठाकरे यांनी औरंगाबादचे नाव बदलून संभाजीनगर करण्याची मागणी केली. त्यावर बोलताना राज ठाकरे यांनी उध्दव ठाकरे यांचा समाचार घेतला. बीकेसी मैदान मुंबई येथे झालेल्या सभेत उध्दव ठाकरे यांनी बोलताना म्हटले होते की, औरंगाबादचे नाव बदलून संभाजीनगर करण्याची काय गरज आहे? औरंगाबादला मी म्हणतो ना संभाजीनगर मग काय गरज आहे नाव बदलण्याची असे वक्तव्य उध्दव ठाकरे यांनी केले होते. त्याचा राज ठाकरे यांनी समाचार घेतला. राज ठाकरे म्हणाले की, मी म्हणतो म्हणजे तु कोण आहे? तु काय महात्मा गांधी, सरदार पटेल, लाल बहादुर शास्री आहे का? असा सवाल राज ठाकरे यांनी केला.
राज ठाकरे यांनी पंतप्रधान मोदी यांच्याकडे केल्या तीन मागण्या
राज ठाकरे म्हणाले की, पंतप्रधान मोदी यांनी देशात तीन गोष्टी कराव्यात. देशात समान नागरी कायदा लागू करावा, लोकसंख्या नियंत्रणाठी कायदा करावा आणि औरंगाबादचे नामांतर करून संभाजीनगर करावे.