राहुल नार्वेकर यांची पक्षांतरबंदी कायदा चिकीत्सा समिती अध्यक्षपदी नियुक्ती

Update: 2024-01-29 06:05 GMT

शिवसेना, राष्ट्रवादी आमदार अपात्रता प्रकरणाची सुनावणी घेणारे राहुल नार्वेकर (Rahul Narvekar) यांच्यावर पक्षांतरबंदी कायदा चिकीत्सा समिती अध्यक्ष पदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. राहुल नार्वेकरांनी यांनी ज्या दहाव्या परिशिष्ठाचा आमदार अपात्रता प्रकरणांमध्ये वारंवार आधार घेतला आहे, त्या परिशिष्ठाची चिकित्सा करण्यासाठी नेमण्यात आलेल्या समितीच्या अध्यक्षपदी राहुल नार्वेकरांची नियुक्ती करण्यात आली आहे. लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला (OM Birla) यांनी महाराष्ट्र विधानभवनात झालेल्या ८४व्या अखिल भारतीय पीठासीन अधिकारी व सचिव परिषदेमध्ये ही घोषणा केली आहे.

विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यासमोर गेल्या सहा महिन्यांपासून आधी शिवसेना (Shivsena), नंतर राष्ट्रवादी (NCP) या पक्षांमधील फुटीच्या प्रकरणाची सुनावणी सुरू आहे. आमदार अपात्रता प्रकरणाचा निर्णय घेण्याचा अधिकार विधानसभा अध्यक्षांनाच असल्याचं सर्वोच्च न्यायालयानं या प्रकरणाच्या सुनावणीवेळी स्पष्ट केलं होतं. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांसमोर गेल्या सहा महिन्यांपासून शिवसेनेतील आमदार अपात्रता प्रकरणाची सुनावणी चालू होती. अखेर तीन वेळा मुदतवाढ घेतल्यानंतर १२ जानेवारी रोजी राहुल नार्वेकरांनी शिवसेना प्रकरणी निकाल दिला आहे. तर आता ३१ जानेवारीपर्यंत राष्ट्रवादीच्या प्रकरणाचा निकाल देण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले असून त्यावर सुनावणी चालू आहे.

Tags:    

Similar News