राहुल गांधींचा पुनश्च 'हम दो..हमारे दो' चा टोला

पंतप्रधान नरेंद्र मोदी गृहमंत्री अमित शहा आणि अदानी अंबानी असे हम दो हमारे दो का टोला संसदेत लावल्यानंतर आता सरदार वल्लभभाई पटेल स्टेडियम च्या नामांतरावर राहुल गांधी यांनी पुन्हा एकदा भाजपवर टीका केली आहे.

Update: 2021-02-25 04:18 GMT

काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी 'हम दो..हमारे दो' हा हॅशटॅग वापरत पुन्हा पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका केली. सत्य कसे सुंदरतेने बाहेर येते. नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये अदानी एन्ड आणि रिलायन्स एन्ड आहेत. याचे अध्यक्ष जय शाह आहेत, असे टि्वट राहुल गांधींनी केले आहे.

काल गुजरातमधील मोटेरा येथील सरदार वल्लभभाई पटेल स्टेडीयमचे नाव बदलून नरेंद्र मोदी स्टेडीयम असे करण्यात आले. भारत इंग्लंड सामना सुरु होण्याआधी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते स्टेडियमचं उद्घाटन करण्यात आल्यानंतर या स्टेडियमध्ये दोन बॉलिंग एन्ड आहेत. त्यातील एकाचे नाव अदानी एन्ड आणि दुसऱ्याचे नाव रिलायन्स एन्ड असं स्पष्टकझालं आहे. यावरून नव्या वादाला तोंड फुटले आहे. काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी 'हम दो..हमारे दो' हा हॅशटॅग वापरत पुन्हा पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका केली.सत्य कसे सुंदरतेने बाहेर येते. नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये अदानी एन्ड आणि रिलायन्स एन्ड आहेत. याचे अध्यक्ष जय शाह आहेत, असे टि्वट राहुल गांधींनी केले आहे. तसेच' हम दो हमारे दो' हा हॅशटॅग त्यांनी टि्वट केला आहे. राहुल गांधी गेल्या काही दिवसांपासून मोदी सरकारवर, 'हम दो..हमारे दो' असं सांगत मोदी सरकारवर निशाणा साधला आहे.

मोदी सरकार हे अदानी आणि अंबानी यांना झुकतं माप देतातं, असा आरोप विरोधी पक्षांकडून केला जातो. काँग्रेसने मोदींवर टीका करत सरदार वल्लभभाई पटेल यांनी आरएसएसवर बंदी आणल्याबद्दल भाजपाने आता "बदला" घेतला आहे, असे काँग्रेसने म्हटलं आहे. तसेच भाजपाने स्वतःचा वारसा निर्माण करावा, असेही काँग्रेसने सुचवले.

सरदार वल्लभभाई पटेल मोटेरा स्टेडियम असे नाव आधी या स्टेडियमला देण्यात आले होते. मात्र, आता हे स्टेडियम नरेंद्र मोदी स्टेडियम नावाने दिले आहे. हे स्टेडियम 63 एकर जागेवर पसरले असून त्यास तयार करण्यास 800 कोटी रुपये लागले आहेत. सुमारे 1 लाख 32 हजार प्रेक्षकांना बसतील, येवढे मोठे स्टेडियम आहे. ऑस्ट्रेलियातील 90 हजार प्रेक्षकांची क्षमता असलेल्या मेलबर्न स्टेडियमला नरेंद्र मोदी स्टेडियमने मागे टाकून जगातील सर्वात मोठे स्टेडियम असा मान मिळाला आहे.

Tags:    

Similar News