नंदुरबारहून सुरु होणार राहुल गांधींची भारत जोडो आदिवासी न्याय यात्रा

Update: 2024-03-09 05:34 GMT

News: काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली सध्या गुजरात राज्यात सुरू असलेल्या भारत जोडो न्याय यात्रेचा समारोप १० मार्चला महाराष्ट्राच्या सीमेलगत असलेल्या सोनगढ येथे होणार आहे. त्यानंतर 12 मार्च पासून महाराष्ट्रातून यात्रेची सुरुवात नंदुरबार येथून करण्यात येणार आहे.

भारत जोडो 'आदिवासी न्याय' यात्रा नामकरण -

सद्या गुजरात राज्यात भारत जोडो यात्रा सुरु आहे. गुजरात ला लागून असलेल्या महाराष्ट्रातील नंदुरबार जिल्ह्यात आगमन होणार आहे. आदिवासी जिल्हा असल्याने या यात्रेला 'भारत जोडो आदिवासी न्याय यात्रा' असं नावं देण्यात आलं आहे.

देशात मोठ्या संख्येने आदिवासी समाज आहे. अनेक वर्ष आदिवासी कायम काँग्रेसच्या बाजुने उभे राहिले आहेत. मध्यल्या काळात हा समाज काँग्रेस पासून दुरावाला आहे. ह्या समाजाला पुन्हा आपल्याकडे वळवण्यासाठी काँग्रेस प्रयत्नशील आहे. 12 मार्च ला राहुल गांधी नंदुरबार येथ जाहीर सभा घेणार आहेत. यावेळी आदिवासीचा मुद्दा मांडण्याची श्यक्यता आहे. महाराष्ट्रात राहुल गांधींची 12 मार्च ते 17 मार्च पर्यंत यात्रा असणार आहे. मुंबईत यात्रेची शेवटची सभा होईल. तोपर्यंत देशात निवडणुका लागलेल्या असतील.

काँग्रेस आणि नंदुरबार जिल्ह्याचं नातं -

स्वतंत्र प्राप्ती पासून तर 2014 पर्यंत काँग्रेसचा एकेकाळचा बालेकिल्ला म्हणून नंदुरबार-धुळेची ओळख होती. काँग्रेस कार्यकाळात तत्कालीन पंतप्रधान स्व. इंदिरा गांधी, राजीव गांधी यांनी देशातील योजनांची सुरुवात नंदुरबार येथून केली आहे. देशाच्या प्रत्येक नागरिकांची ओळख बनलेल्या 'आधार कार्ड' चा शुभारंभ शहादा नंदुरबार येथूनच झाली होती.पाहिलं आधार कार्ड आदिवासी महिलेला देऊन सुरवात झाली होती. जिल्ह्यातील आदिवासी बांधवांनी गांधी घराण्यावर प्रेम केले आहे. त्या अनुषंगाने काँग्रेस नेते तथा खासदार राहुल गांधी यांची सुरू असलेली भारत जोडो यात्रा महाराष्ट्रातून 'भारत जोडो आदिवासी न्याय यात्रा' म्हणून नंदुरबार येथून सुरू होईल.

मुंबईत यात्रेची भव्य सभा -

राहुल गांधी यांच्या नेतृत्वात सुरू असलेली भारत जोडो यात्रा सध्या गुजरात राज्यात सुरू आहे.उदया म्हणजे १० मार्च रोजी सोनगढ येथे यात्रेचा समारोप होणार आहे. त्यानंतर राहुल गांधी हे १२ मार्च रोजी थेट दिल्लीहून नंदुरबारला येतील. दरम्यान विमानाने सुरत व सुरतहून वाहनाने नवापूर मार्गे

नंदुरबार येथे दुपारी १२.३० वाजेपर्यंत येतील. नंदुरबार येथे भारत जोडो आदिवासी न्याय यात्रेच्या माध्यमातून खासदार गांधी जिल्ह्यातील जनतेला संबोधित करतील. दुपारी १ वाजता यात्रा दोंडाईचाकडे रवाना होईल. दोंडाईचा, धुळे, नाशिक, मार्गे यात्रा मुंबईला या यात्रेचा समारोप भव्य सभेने होणार आहे. या सभेला राष्ट्रवादीचे शरद पवार, उद्धव ठाकरे तसंच इंडिया आघाडीच्या घटक पक्षांना आमंत्रित केले जाणार असल्याची श्यक्यता आहे.

Tags:    

Similar News