Rahul Gandhi Defamation Case : राहुल गांधी यांना दिलासा नाही, पण न्यायालयाने केली महत्वाची टिपण्णी

मोदी समाजाचा अपमान केल्याप्रकरणी राहुल गांधी यांना सुरत कोर्टाने दोषी ठरवले होते. त्यावर गुजरात उच्च न्यायालयात सुनावणी झाली. त्यात राहुल गांधी यांची याचिका फेटाळून लावली.;

Update: 2023-07-07 09:25 GMT


Rahul Gandhi case : राहुल गांधी यांनी मोदी समाजाचा अपमान केल्याच्या आरोपाप्रकरणी त्यांना सुरत कोर्टाने दोन वर्षांची शिक्षा सुनावली होती. त्यामुळे राहुल गांधी यांची खासदारकी रद्द करण्यात आली होती. त्यामुळे सुरत न्यायालयाच्या विरोधात राहुल गांधी यांनी गुजरात उच्च न्यायालयात धाव घेतली होती. मात्र गुजरात उच्च न्यायालयाने राहुल गांधी यांची याचिका फेटाळून लावली. (Rahul Gandhi Gujral high court)

गुजरात उच्च न्यायालयाचे न्यायमुर्ती हेमंत प्रच्छक यांनी याचिका फेटाळताना म्हटले की, राहुल गांधी यांनी दाखल केलेली याचिका ही अस्वित्वहीन मुद्द्यांवर आधारीत आहे. दोष सिद्ध झाल्यानंतर त्यावर स्थगिती देण्यासंदर्भात कोणताही नियम नाही. एवढंच नाही तर राहुल गांधी यांच्याविरोधात अशाच प्रकारच्या 10 केस आहेत. राजकारणात आता शुद्धता आणण्याची आवश्यकता आहे. याआधीही राहुल गांधी यांनी वीर सावरकर यांच्याविषयी केंब्रीज विद्यापीठात केलेल्या वक्तव्यावरून वीर सावरकर यांच्या नातूने पुणे येथे केस दाखल केली आहे. त्यामुळे दोषसिध्दीला स्थगिती देऊन ज्यांनी तक्रार दाखल केली आहे. त्यांच्यावर कोणत्याही परिस्थितीत अन्याय करता येणार नाही. दोषसिद्धी ही योग्य आणि कायदेशीर आहे. त्यामुळे आम्ही राहुल गांधी यांची याचिका फेटाळून लावत असल्याचे न्यायमुर्ती हेमंत प्रच्छक यांनी म्हटले आहे. (Verdict of Rahul Gandhi defamation case)

नेमकं प्रकरण काय?

राहुल गांधी यांनी 2019 च्या लोकसभा निवडणूकीच्या प्रचारादरम्यान कर्नाटकमधील कोलार येथे बोलताना ललित मोदी, नीरव मोदी, अनिल अंबानी, नरेंद्र मोदी हे मोदी नावाचे सगळे चोर कसे आहेत? अशा आशयाचे वक्तव्य केले होते. त्यानंतर गुजरातचे आमदार पुर्णेश मोदी यांनी राहुल गांधी यांच्याविरोधात सुरत येथे तक्रार दाखल केली होती. त्याप्रकरणी राहुल गांधी यांना 23 मार्च 2023 रोजी दोन वर्षांची शिक्षा सुनावली. त्यानंतर 24 मार्च 2023 रोजी लोकसभा अध्यक्षांनी राहुल गांधी यांच्यावर अपात्रतेची कारवाई केली. त्यामुळे राहुल गांधी यांनी 2 एप्रिल रोजी न्यायालयात याचिका दाखल केली. त्यावर न्यायालयाने राहुल गांधी यांची याचिका फेटाळून लावली आहे.

Tags:    

Similar News