#EDचौकशीनंतर राहुल गांधींचा थेट मोदींवर हल्ला..
`मला ५५ तास ईडीच्या कार्यालयात बसवलं. पण मी मोदींना सांगतो मी तुम्हाला घाबरत नाही. तुम्ही मला ५०० तास जरी ईडीच्या कार्यालयात बसवलं तरी मला फरक पडणार नाही. या देशात संविधान आहे. जर आपण हुकुमशाही विरोधात उभे राहिलो नाही तर हा देश वाचणार नाही”, अशा शब्दात कॉंग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी मोदी सरकारवर हल्ला चढवला आहे.``
`मला ५५ तास ईडीच्या कार्यालयात बसवलं. पण मी मोदींना सांगतो मी तुम्हाला घाबरत नाही. तुम्ही मला ५०० तास जरी ईडीच्या कार्यालयात बसवलं तरी मला फरक पडणार नाही. या देशात संविधान आहे. जर आपण हुकुमशाही विरोधात उभे राहिलो नाही तर हा देश वाचणार नाही", अशा शब्दात कॉंग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी मोदी सरकारवर हल्ला चढवला आहे.``
देशात वाढती महागाई, जीवनावश्यक वस्तूंवरची जीएसटी आणि बेरोजगारीच्या मुद्द्यावरुन काँग्रेस आक्रमक झाली आहे. राहुल गांधींच्या नेतृत्त्वात आज रामलीला मैदानावर मोदी सरकारविरोधात हल्लाबोल रॅलीचे आयोजन करण्यात आलं आहे. या रॅलीदरम्यान आयोजित करण्यात आलेल्या जाहीर सभेत राहुल गांधींनी मोदी सरकारवर निशाणा साधला आहे.
एक देश उद्योगपतींचानरेंद्र मोदी ची विचारधारा देशाचं विभाजन करण्याची आहे आमची विचारधारा दोन चार उद्योगपतीला फायदा देणारी नाही.युपीए काळात ७० हजार कोटी कर्ज माफ केलं. जर युपीएने नरेगा आणला नसता तर देशात आग लागली असती असंही त्यांनी सांगितलं.
आम्ही २७ कोटी लोकांना गरिबीमधून बाहेर काढलं. मोदींनी मागच्या ८ वर्षात २३ कोटी लोकांना गरीबीत टाकलं आहे. देशात जितकी द्वेष वाढेल तितका देशाला धोका आहे. नरेंद्र मोदी आणि भाजप देशाला कमजोर करत आहे. कॉंग्रेस पार्टी ची विचारधारा कार्यकर्ता देशाला प्रगतीवर नेतील असही गांधी म्हणाले.
या देशातील गरिबांना या द्वेषाचा फायदा झाला का?या द्वेषाचा फायदा देशातील दोन व्यक्तींचा झाला आहे.देशाचे एअरपोर्ट, पोर्ट या दोन व्यक्तींकडे जात आहे. माध्यमं लोकांना घाबरवत आहे. त्याचा फायदा या देशातील दोन व्यक्तींना दिला जात आहे. नोटाबंदींचा फायदा कोणाला झाला?उद्योगपतींचं कर्ज माफ केलं जात आहे.तीन कृषी कायदे या दोन उद्योगपतींसाठी होते, असं गांधी म्हणाले.
संसदेत कोणत्याही मुद्द्यावर बोलायला गेलं तर माइक बंद केला जातो. चीनवर बोलायला गेलं तर माइक बंद केला जातो. माध्यमांवर, न्याय व्यवस्थेवर दबाव आहे. म्हणून आम्ही थेट जनतेत जाणार आहोत. त्यासाठी भारत जोडो यात्रा काढणार आहोत, असंही त्यांनी सांगितलं.
राहुल गांधी यांच्या भाषणातील महत्त्वाचे मुद्दे
> केद्रात भाजपचे सरकार आल्यापासून देशात द्वेष वाढत आहे. देशात भविष्यात, बेरोजगारीची भीती, महागाईची भीती वाढत आहे. या भीतीचा फायदा देशातील दोनच उद्योगपती घेत आहेत.
>संपूर्ण मीडिया याच दोन उद्योगपतींच्या हातात आहे.सत्य कोण दाखवणार? हे दोघेही पंतप्रधानांसाठी काम करतात आणि मोदीजी या दोघांसाठी काम करतात. या दोघांच्या पाठिंब्याशिवाय मोदीजी पंतप्रधान होऊ शकत नाहीत.
>माध्यमं आमचे नाहीत. त्यामुळे विरोधकांकडे कोणताही मार्ग उरला नाही, फक्त एकच मार्ग उरला आहे तो म्हणजे थेट जनतेपर्यंत जाणे.
>ईडीने मला ५५ तास बसवून ठेवले. मी नरेंद्र मोदीजींना सांगू इच्छितो, मी तुमच्या ईडीला घाबरत नाही
>माध्यमांवर न्यायव्यवस्थेवर दबाव आहे. म्हणून आम्ही थेट जनतेत जाणार आहोत. त्यासाठी भारत जोडो यात्रा काढणार…