मराठा समाजाचा सामाजिक मागासलेपणा सिद्ध करण्यासाठी करण्यात येणाऱ्या सर्वेक्षणाच्या निकषासंबंधीतील बैठक पुण्यात पार पडली. माजी न्यायाधीश आनंद निरगुडे यांच्या अध्यक्षतेखाली राज्य मागासवर्गीय आयोगाची बैठक पार पडली.
मराठा समाजाचे सामाजिक मागासलेपण सिद्ध करण्यासाठी करण्यात येणाऱ्या सर्वेक्षणा संबंधित असणारे निकष आणि सर्वेक्षणा संदर्भात आवश्यक असणारी प्रश्नावली चे काम पूर्ण झाले. या संदर्भात पुढील बैठकीमध्ये अंतिम निर्णय होणार आहे. राज्य सरकारने दिलेल्या आदेशानुसार मराठा समाजाचे सामाजिक मागासलेपण सिद्ध करण्यासाठी संबंधित प्रश्नावली तयार करण्यात आली आहे.
संबंधित सर्वेक्षण कोणत्या पद्धतीने करायचे. या सर्वेक्षणासाठी लागणारा निधी किती द्यायचा यासंदर्भातील निर्णय राज्य सरकार घेईल. मात्र या सर्वेक्षणासाठी लागणारा निधी राज्य मागासवर्गीय आयोगाला उपलब्ध करून देण्यासंदर्भात राज्य सरकारला प्रस्ताव देण्यात आला आहे.