कॅप्टन अमरिंदर सिंह कॉंग्रेसला अखेर राम राम, भाजपमध्ये सामील होणार?

कॅप्टन अमरिंदर सिंह कॉंग्रेसला अखेर राम राम, भाजपमध्ये सहभागी होणार?

Update: 2021-09-30 08:31 GMT

पंजाब कॉग्रेस मध्ये सुरु असलेल्या राजकीय घडामोडी थांबताना दिसत नाही. माजी मुख्यमंत्री अमरिंदर सिंह यांनी आता कॉंग्रस सोडण्याची घोषणा केली आहे. यावेळी त्यांनी आपण भाजप मध्ये सहभागी होणार नसल्याचं म्हटलं आहे. आपण अधिक काळ अपमान सहन करु शकत नाही. असं कॅप्टन अमरिंदर सिंह यांनी म्हटलं आहे.

अमरिंदर सिंह यांनी नुकतीच गृहमंत्री अमित शहा यांची दिल्लीतील त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली होती. त्यांच्या या बैठकीनंतर वेगवेगळ्या चर्चा सुरु झाल्या आहेत.

पंजाब च्या मुख्यमंत्रिपदावरून पायउतार झाल्यापासून ते भाजप प्रवेश करणार असल्याची चर्चा आहे. मात्र, मंगळवारी दिल्ली येथे अमित शहा यांची ही भेट झाल्याने या शक्यतांना अधिक उधाण आलं असताना आज त्यांनी कॉंग्रेसमधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आहे.

कॅप्टन यांचे प्रवक्ते ठुकराल यांनी, त्यांच्या दिल्ली भेटीबाबत कोणतंही अनुमान बांधू नये. ते दिल्ली येथे त्यांच्या काही जुन्या मित्रांना भेटतील आणि नवीन मुख्यमंत्रिपदासाठी दिल्लीतील कपूरथला हाऊस रिकामे करतील.

मात्र, आता त्याच रवीन ठुकराल यांनी अमरिंदर सिंह आणि अमित शहा यांच्या भेटीनंतर अमरिंदर सिंह यांचं एक ट्विट रिट्विट केलं आहे.

स्वत: कॅप्टन अमरिंदर सिंह यांनीही या वृत्ताला दुजोरा दिला आहे. त्यांनी ट्विट केले आहे की,

'दिल्ली येथे केंद्रीय गृहमंत्र्यांना भेटलो. शेतकऱ्यांच्या आंदोलनासंदर्भात चर्चा करून यावर तोडगा काढण्याची विनंती केली.''

या आशयाचं ट्वीट केलं होतं.

https://twitter.com/capt_amarinder/status/1443229032665939971?ref_src=twsrc^tfw|twcamp^tweetembed|twterm^1443229032665939971|twgr^|twcon^s1_c10&ref_url=https://www.satyahindi.com/politics/captain-amarinder-singh-meets-amit-shah-121906.html

दरम्यान, काही दिवसांपूर्वीच कॅप्टन यांनी पंजाबच्या मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला होता. त्यांच्या जागी चरणजीत सिंह चन्नी यांना मुख्यमंत्री बनवण्यात आले आहे.

दरम्यान, कॅप्टन अमरिंदर सिंह आणि नवज्योतसिंग सिद्धू यांच्यातील तणाव बराच काळ चालला होता. या तणावाच्या दरम्यान, 10 दिवसांपूर्वी अमरिंदर सिंह यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागला.

कॅप्टनच्या तीव्र विरोधानंतर काँग्रेस हायकमांडने नवज्योत सिंह सिद्धू यांना प्रदेशाध्यक्ष बनवले. ते अध्यक्ष झाल्यानंतर, कॅप्टन यांच्यावर अधिक दबाव होता. कॅप्टनच्या राजीनाम्यापूर्वी पंजाब काँग्रेस विधिमंडळ पक्षाची बैठक बोलावण्यात आली होती.

कोण आहे कॅप्टन अमरिंदर सिंह?

दरम्यान, अमरिंदर सिंह हे जवळपास दहा वर्षे पंजाबचे मुख्यमंत्री राहिले आहेत. त्यांनी भारतीय लष्करात देखील सेवा केली आहे. ते पटियाला राजघराण्यातील आहेत. अनुभवी अमरिंदर सिंहे हे पंजाब काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्यांपैकी एक आहेत. पण जेव्हा त्यांना पंजाबच्या मुख्यमंत्रीपदावरून पायउतार व्हावे लागले, तेव्हा त्यांनी आपल्याकडे पर्याय असल्याचे सांगितले. मग प्रश्न पडला, त्यांचे पर्याय काय आहेत?

अमित शहा यांची भेट घेण्याआधी असा अंदाज लावला जात होता की, ते काँग्रेस सोडून भाजपसोबत जाण्यास तयार आहेत की अकाली दलाशी हातमिळवणी करण्यासाठी? अकाली नेत्यांशी सौम्य पवित्रा घेतल्याचा त्यांच्यावर अनेकदा आरोप सुद्धा केला गेला आहे. यासोबतच, ते काँग्रेस सोडून नवीन पक्ष स्थापन करतील की काय? अशी देखील शक्यता व्यक्त केली जात आहे.

मात्र, कॅप्टन अमरिंदर सिंह यांनी अमित शहा यांची भेट घेतल्यानं ते भाजप मध्ये सहभागी होणार की, भाजपच्या सल्ल्याने नवीन पक्ष काढणार असा देखील सवाल उपस्थित केला जात आहे.

Tags:    

Similar News