Punjab Exit Poll च्या अंदाजानुसार काँग्रेसची पंजाबमधून Exit आपला मोठा विजय

देशात ५ राज्यांच्या निवडणूकांसाठी मतदानाची प्रक्रिया पार पडल्यानंतर आता विविध संस्थाच्या Exitt Poll ने अंदाज व्यक्त केला आहे.;

Update: 2022-03-07 16:49 GMT

देशात ५ राज्यांच्या निवडणूकांसाठी मतदानाची प्रक्रिया पार पडली. तर पंजाबमधील अनेक उमेदवारांचे भविष्य मतपेटीत बंद झाले आहे. त्यापार्श्वभुमीवर आता विविध संस्थाच्या Exitt Poll ने अंदाज व्यक्त केला आहे.

पंजाब निवडणूक आरोप प्रत्यारोपांनी आणि विविध घटनांमुळे चर्चेत आली. तर पंजाब विधानसभा निवडणूकीसाठी २० फेब्रुवारी रोजी मतदान पार पडले. त्यामुळे येत्या १० मार्चकडे सर्वपक्षीय उमेदवारांचे डोळे लागले आहेत. त्यातच पंजाब विधानसभेचा कार्यकाळ २७ मार्च २०२२ रोजी संपत आहे. ११७ जागा असलेल्या पंजाबमधील २०१७ च्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसनं ७७ जागा जिंकून दहा वर्षानंतर सत्तेत परतली, तर शिरोमणी अकाली दल-भाजप युती केवळ १८ जागांवर राहीले. आम आदमी पार्टी २० जागा जिंकून प्रमुख विरोधी पक्ष बनला होता. कॅप्टन अमरिंदर सिंग मुख्यमंत्री झाले, पण चार वर्षांनंतर काँग्रेसने कॅप्टन अमरिंदरच्या जागी चरणजीत सिंग चन्नी यांना मुख्यमंत्री केले. पंजाबमध्ये सरकार स्थापन करण्यासाठी कोणत्याही पक्षाला किंवा आघाडीला ५९ जागांचा आकडा गाठावा लागेल.

पंजाब विधानसभेच्या निवडणूकीसाठी २० फेब्रुवारी ला मतदान पार पडले होते. त्यानंतर सर्वपक्षीय उमेदवारांची धाकधूक वाढली होती. तर आता १० मार्च रोजी मतमोजणी होऊन पंजाबच्या सत्तेची सुत्रे कोणाकडे जाणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. त्यापार्श्वभुमीवर आज देशभरतील पाच राज्यातील सातही टप्प्यातील मतदान पार पडले. त्यामुळे आज विविध संस्थांनी एक्झिट पोलच्या माध्यमातून पंजाबमध्ये कोण बाजी मारणार याबाबत दावे केले आहेत.

काय आहे Exitt poll चा अंदाज?

India Today-Axis My India एक्झिट पोल जाहीर झाला आहे. या एक्झिट च्या पोलनुसार पंजाबमधील विधानसभेच्या 117 जागांपैकी काँग्रेसला 19-31 जागा मिळण्याची शक्यता आहे.

त्याचवेळी आपला 76-90 जागा मिळत आहेत, तर अकाली-बसपाला 07-11 जागा मिळत आहेत. दुसरीकडे, भाजपच्या 01-04 जागा कमी झाल्याचं दिसत आहे.



Tags:    

Similar News