भोसरी MIDC भूखंड प्रकरणी सक्तवसुली संचालनालय (ED) कार्यालयात राष्ट्रवादीचे जेष्ठ नेते एकनाथ खडसे अखेर दाखल झाले आहेत. आज सकाळी 11 वाजता ते ED कार्यालयात दाखल झाले असून त्यांच्या चौकशीला सुरुवात झाली आहे.
एकनाथ खडसे यांचे जावई गिरीश चौधरी यांची 12 तास चौकशी झाली. त्यानंतर त्यांना ईडीने अटक केली होती. त्यानंतर खडसे यांना समन्स पाठवून कार्यालयात हजर राहण्यास सांगितलं होतं,खडसे यांनाही अटक होईल अशी राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा रंगली होती.
मात्र, रात्री तब्बेत खराब असल्याचं कारण देत खडसे यांनी पत्रकार परिषद रद्द केली होती. त्यामुळं खडसे ईडीच्या चौकशीला जातील का? याबाबत तर्कवितर्क लावले जात असताना आज सकाळी खडसे यांनी माध्यमांशी बोलतांना सांगिलत की आपण ED ला संपूर्ण सहकार्य करणार आहोत. तसंच तपास यंत्रणेमार्फत आपल्या कुटुंबियांचा छळ केला जात असल्याचा आरोप त्यांनी यावेळी केला.
त्यानंतर खडसे ED कार्यालयात दाखल झाले. आता खडसे यांची किती तास चौकशी होते आणि त्यानंतर अटक होणार का याबाबत जोरदार चर्चा रंगली आहे. खडसें नंतर त्यांच्या पत्नी मंदाताई खडसे यांचीही चौकशी ED करणार असल्याचे सुत्रांकडून समजतंय.