प्रियांका गांधी उत्तरप्रदेश मुख्यमंत्रीपदाचा चेहरा?
``क्या आपको उत्तर प्रदेश में कांग्रेस पार्टी की तरफ़ से किसी और का चेहरा दिख रहा है? मेरा चेहरा हर जगह दिख रहा है,``असं सांगत खुद्द प्रियंका गांधी यांनीच आगामी उत्तरप्रदेश निवडणुकांमध्ये कॉंग्रेसच्या मुख्यमंत्रीपदाचा चेहरा आपण असू असे स्पष्ट संकेत दिले आहेत;
``क्या आपको उत्तर प्रदेश में कांग्रेस पार्टी की तरफ़ से किसी और का चेहरा दिख रहा है? मेरा चेहरा हर जगह दिख रहा है,``असं सांगत खुद्द प्रियंका गांधी यांनीच आगामी उत्तरप्रदेशमधील कॉंग्रेसच्या मुख्यमंत्रीपदाच्या उमेदवारीचे संकेत दिले आहेत.
दिल्लीतील कॉंग्रेसभवनमधे आज उत्तरप्रदेश विधानसभा निवडणुकीचा जाहीरनामा जाहीर करण्यात आला. त्यावेळी पत्रकारांनी कॉंग्रेसच्या मुख्यमंत्रीपदाचा चेहरा कोण? असा प्रश्न उपस्थित केला होता.
पत्रकारांच्या प्रियंका गांधी म्हणाल्या, उत्तर प्रदेशात काँग्रेसचा मुख्यमंत्री पदाचा चेहरा माझा चेहरा प्रत्येक ठिकाणी दिसत आहे. उत्तर प्रदेश निवडणूक काँग्रेस पार्टी चांगलं प्रदर्शन करेल. जशी मुख्यमंत्री पदाच्या बाबतीत प्रश्न विचारता, तो माझा चेहरा सर्वात जास्त दिसत आहे, असंही प्रियंका गांधी यांनी स्पष्ट केलं.
उत्तर प्रदेश काँग्रेसची प्रभारी प्रियंका गांधी वड्रांनी सांगितले, पंजाबमधे काँग्रेस पार्टी पुन्हा एकदा सत्तेत येईल. उत्तराखंडातही परिणाम कॉंग्रेसच्या बाजूने आहेत. उत्तर प्रदेशमधे आम्ही चांगली लढत देऊ. प्रियंका गांधी यांनी सांगितले की आम्ही त्याचे उत्तर प्रदेशात प्रलंबित विकास करण्याचा प्रयत्न करतोय, त्यासाठी जनता आमच्यासोबत असेल. आज निवडणुकांसाठी जात आणि धर्मावर प्रचार केला जात आहे.भविष्य की काय असेच उत्तर प्रदेश का भविष्य उच्जवल होऊ शकते. उत्तर प्रदेशातून देशाची राजकारण निश्चित होते, असंही प्रियंका गांधी म्हणाल्या.