पंतप्रधान नरेंद्र मोदींचा आज रामटेक दौरा, तीन मतदारसंघांसाठी होणार संयुक्त सभा

Update: 2024-04-10 05:44 GMT

राज्यात लोकसभा निवडणूकीच्या प्रचारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांची जय्यत तयारी सुरू असून आज मोदींचा आज रामटेक दौरा आहे. आज त्यांची नागपूरच्या कन्हानमध्ये भव्य सभा होणार आहे. सभेचं स्थळ कन्हान हे नागपूर आणि भंडारा या जिल्ह्याच्या सीमेवर असल्यामु्ळे नागपूर (Nagpur), रामटेक (Ramtek), आणि भंडारा-गोंदिया(Bhandara-Gondiya) या तिन्ही लोकसभा मतदारसंघात असलेल्या मतदारांसाठी ही सभा संयुक्तरित्या आयोजित केली गेली आहे. त्यामुळे या सभेला तिनही लोकसभा मतदारसंघातील जनता लाखोंच्या संख्येने गर्दी करणार असल्याचा दावा महायुतीच्या नेत्यांकडून करण्यात आला आहे. या होणाऱ्या भव्य सभेच्या स्थळाची पूर्वपाहणी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde)यांनी काल रात्री जाऊन केली.

सभेदरम्यान पाऊस(Rain) येण्याची शक्यता -

पंतप्रधान मोदींच्या कन्हान येथे होणाऱ्या या सभेत पाऊस येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. आज नागपूरसाठी नागपूर वेध शाळेनं ऑरेंज अलर्ट (Orange Alert) जारी केला आहे, नागपूर परिसरात वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस आणि गारपिटाचाही इशारा देण्यात आला आहे. सभास्थळी आयोजकांकडून डोम उभारण्यात आले आहेत, त्यामुळे पाऊस आला तरी त्याचा या सभेवर विशेष परिणाम होणार नाही, असं आयोजकांनी सांगितले. असं असलं तरी नेमक्या वेळी पावसाने आगमन केलं तर लोकांची तारांबळ उडण्याची शक्यता नाकारता येत नाही.

या तिन्ही लोकसभा मतदारसंघात संयुक्तरित्या होणाऱ्या या सभेच्या तयारीसाठी प्रशासनानं जोरदार तयारी केली असून कन्हानमधील बंद पडलेल्या ब्रुक बाँड या कंपनीच्या तब्बल १८ एकर असलेल्या मोकळ्या जागेत ही सभा पार पडणार आहे, याशिवाय पोलिसांच्या फौजफाट्याह सभास्थळी नियोजित बंदोबस्त करण्यात आला आहे. 

Tags:    

Similar News