अकाली प्रौढत्व; अनिकेत तटकरे यांची रोहित पवार यांच्यावर टीका

Update: 2023-09-23 12:50 GMT

अजित पवार यांनी बंड केल्यानंतर रोहित पवार यांनी थेटपणे अजित पवार यांच्यावर टीका करणे टाळले होते. मात्र आता रोहित पवार यांनी अजित पवार यांच्यावर टीका केली. त्याला आमदार अनिकेत तटकरे यांनी प्रत्युत्तर दिले आहे.

रोहित पवार यांनी अजित पवार यांच्या गटाकडून राष्ट्रवादीच्या आमदारांना ब्लॅकमेल केलं जात असल्याचं म्हटलं आहे. त्याबरोबरच अजित दादा तिकडे गेले असले तरी मी विचारांचा पक्का आहे. त्यामुळे मी महाराष्ट्राच्या पुरोगामी विचारासोबतच राहणार असल्याचे रोहित पवार म्हणाले. यावेळी त्यांनी अजित पवार यांच्यावर टीका केली. त्याला अनिकेत तटकरे यांनी प्रत्युत्तर दिले आहे.

अनिकेत तटकरे म्हणाले, काही लोक फक्त अजित पवार यांचीच नाही तर सुप्रिया सुळे, शरद पवार आणि जयंत पाटील यांची जागा घेऊ पाहत आहेत, असं म्हणत अकाली प्रौढत्व असा हॅशटॅग वापरला आहे. त्यामुळे अनिकेत तटकरे यांनी रोहित पवार यांना अकाली प्रौढत्व आल्याचं म्हटल्याची चर्चा रंगली आहे.

Tags:    

Similar News