मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमामुळे विद्यार्थ्यांचे हाल, प्राजक्त तनपुरे यांनी शेअर केला व्हिडीओ
शिंदे-फडणवीस-पवार सरकारने शासन आपल्या दारी या योजनेसाठी शिर्डीत कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. या कार्यक्रमाला गर्दी जमवण्यासाठी एसटी बस मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमाला तैनात करण्यात आल्या आहेत. त्यामुळे शालेय आणि महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचे हाल सुरु असल्याचे दिसून आले. यासंदर्भातील व्हिडीओ माजी मंत्री प्राजक्त तनपुरे यांनी ट्वीट केला आहे.
यासंदर्भात मिळालेल्या माहितीनुसार संगमनेर आगारानेही 63 बस पाठवल्या आहेत. त्यामुळे ग्रामिण आणि शालेय फेऱ्या रद्द करण्यात आल्या आहेत. तसेच नाशिक अहमदनगर, पुणे, छत्रपती संभाजीनगर, शेवगाव, पाथर्डी या मार्गावरील बसने प्रवास करावा. तसेच मुक्कामी गाड्या बंद राहतील, अशीही सूचना संगमनेर आगारातर्फे लावण्यात आली आहे. त्यामुळे एकीकडे शासन आपल्या दारी म्हणत कार्यक्रम घेतला जातो. मात्र दुसरीकडे विद्यार्थ्यांचे हाल होताना दिसत आहेत