राज ठाकरे यांच्या अयोद्धा दौऱ्याविरोधात राजधानी दिल्लीतही पोस्टरबाजी
राज ठाकरे यांचा आयोध्य़ा दौरा चांगलाच वादात सापडला आहे. उत्तर प्रदेशसह आता दिल्लीतही राज ठाकरे यांच्या विरोधात बॅनर लागले आहेत.
राज ठाकरे यांनी हिंदूत्वाच्या मुद्द्यावरून भुमिका घेतली आहे. त्यामुळे राज ठाकरे यांच्या भुमिकेवरून जोरदार टीका केली जात असतानाच राज ठाकरे यांनी आयोध्या दौरा जाहीर केला. त्यामुळे मनसे कार्यकर्त्यांमध्ये चैतन्य निर्माण झाले होते. मात्र या दौऱ्याला भाजप खासदार ब्रिजभुषण सिंह यांनी विरोध करत चलो आयोध्येचा नारा दिला.
राज ठाकरे यांच्या आयोध्या दौऱ्याला विरोध करण्यासाठी खासदार ब्रिजभुषण सिंह यांनी चलो आयोध्या नारा दिला आहे. तर राज ठाकरे यांच्या विरोधात उत्तर प्रदेशात वातावरण तापवले जात आहे. त्यातच राज ठाकरे यांच्या आयोध्या दौऱ्याला विरोध करणारे अनेक बॅनर उत्तरप्रदेशमध्ये लागले आहेत त्यातच राज ठाकरे यांच्याविरोधात उत्तर भारतीय नागरिकांनी मोठ्या प्रमाणावर निदर्शने करायला सुरूवात केली आहे. त्यामुळे राज ठाकरे यांच्या दौऱ्याला अडचणी निर्माण झाल्या आहेत. मात्र उत्तर प्रदेश पाठोपाठ राज ठाकरे यांच्याविरोधात आता दिल्लीतही पोस्टरबाजी सुरू आहे.
राज ठाकरे यांच्या आयोध्या दौऱ्याला विरोध करण्यासाठी दिल्लीतील अपोलो मेट्रो स्टेशनच्या बाहेर पोस्टर लावण्यात आले आहेत. तसेच राज ठाकरे यांनी प्रभु राम यांचे वंशज उत्तर भारतीयांचा महाराष्ट्रात अपमान केला असल्याने राज ठाकरे हे अपराधी आहेत. त्यामुळे राज ठाकरे यांनी उत्तर भारतीयांची माफी मागावी अशी मागणी भाजप खासदार ब्रिजभुषण सिंह यांनी केली आहे. तसेच राज ठाकरे माफी मागितल्याशिवाय अयोद्धेत आले तर राज ठाकरे यांचा आम्ही उत्तर भारतीय विरोध करणार असे म्हटले आहे. त्यामुळे राज ठाकरे यांचा आयोध्या दौरा वादात सापडला आहे.