पत्र व्हायरल करण्याची काही गरज नव्हती. फोन करून किंवा व्हाट्सअप च्या माध्यमातून देखील म्हणणं मांडता आलं असतं. असं राष्ट्रवादी चे विधान परिषदेचे आमदार अमोल मिटकरी म्हणाले. तर भाजपच्या प्रविण दरेकर यांनी सांगितलं की लोकांमध्ये संभ्रम निर्माण होऊ नये म्हणून पत्र पब्लिक डोमेनवर टाकण्यात आलं. फडणवीस यांनी पत्र सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रसिद्ध केल्यामुळे मालिकांना घेऊन आता राजकारण तापल आहे.
मलिकांचा विषय पुढे करून हिवाळी अधिवेशनातील मुख्य विषय वळवायचे हा सरकारचा एक डाव आहे. भाजपने अनेक आरोप केलेले राजकीय नेते आज सरकार मध्ये मंत्री आहे. असं असताना भाजपसाठी मलिक का वेगळे आहेत असा प्रश्न विरोधकांनी उपस्थित केला आहे. हिवाळी अधिवेशनातील मुख्य विषयांना बगल देण्यासाठी हे असे राजकीय विषय आणले जातात. आसा आरोप देखील विरोधकांनी केला आहे.
नवाब मलिक यांना महायुतीत स्थान देऊ नये. अशा आशयाचे पत्र सोशल मीडियाच्या माध्यमातून फडणवीस यांनी अजित पवारांना पाठवल्यानंतर ह्या पद्धतीने मोठ्या प्रमाणात राजकारण तापले आहे. सत्तेत सामील असणाऱ्या तिन्ही पक्षांच्या नेत्यांसोबत विरोधकांनी देखील या पत्राविरोधात आपली मतं मांडली आहे.