बिहारचा मुख्यमंत्री कोण? काय म्हणाले नरेंद्र मोदी
बिहारचा मुख्यमंत्री कोण? काय म्हणाले पंतप्रधान नरेंद्र मोदी? कोण आहे भाजपचा सायलेंट व्होटर पाहा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं बिहार निवडणुकीनंतरचं पहिलं भाषण...
बिहार विधानसभा (Bihar Assembly election) 74 जागा मिळवत भाजप ने बिहारमध्ये पुन्हा एकदा कमबॅक केलं आहे. एनडीए ने नितिश कुमार यांच्या नेतृत्वात ही निवडणूक लढवली होती. मात्र, नितिश कुमार यांच्या पक्षापेक्षा भाजपला अधिक जागा मिळाल्यानं आता बिहारमध्ये नितिशकुमार यांना पुन्हा एकदा मुख्यमंत्री होता येईल का? असा सवाल उपस्थित केला जात आहे.
दरम्यान बिहार निव़डणुकीच्या निकालानंतर निकालानंतर भाजपच्या दिल्ली कार्यालयात पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi), भाजप अध्यक्ष जेपी नड्डा (JP Nadda), संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांच्या उपस्थितीत मोठं सिलेब्रिशन करण्यात आलं.
यावेळी कार्यकर्त्यांना संबोधित करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नितश कुमार यांच्या नेतृत्वात बिहारचा विकास केला जाईल. असे स्पष्ट केलं. त्यामुळं बिहारमध्ये नितिश कुमार हेच मुख्यमंत्री राहतील. हे आता स्पष्ट झालं आहे.
काय म्हणाले मोदी..
मला धमकी देण्याची अजिबात गरज नाही, याचं उत्तर जनता देईल. भाजपच्या शासनात महिलांना सन्मान मिळतो आणि सुरक्षा मिळते म्हणूनच त्या भाजपच्या सायलेंट व्होटर आहेत, भाजपकडे सायलेंट व्होटर, हा व्होटरच भाजपला सतत मतदान करतोय. हा व्होटर आहे देशाच्या माता, भगिनी आणि महिला...
बिहारमध्ये निवडणुकीत आधी बूथ लुटला आणि हल्ल्यांच्या घटना होत होत्या. आता किती टक्के मतदान वाढलं याचं वृत्त दिलं जातं. हाच बिहारमधील मोठा बदल आहे.. मला धमकी देण्याची अजिबात गरज नाही, याचं उत्तर जनता देईल...