सामाजिक हिंसाचार, द्वेषमुलक वक्तव्यांवर पंतप्रधानांचे मौन, देशातील 13 विरोधी पक्षांची टीका
देशात विविध समाज घटकांकडून द्वेषमुलक वक्तव्ये (Hate speech), सामाजिक हिंसाचारासाठी चिथावणी देणारे वक्तव्ये केली जात असताना देशाच्या पंतप्रधानांचे मौन धक्कादायक असल्याची टीका सोनिया गांधी, शरद पवार यांच्यासह देशातील 13 विरोधी पक्षांच्या नेत्यांनी केली.(13 opposition leader criticize to PM Modi);
देशात विविध समाज घटकांकडून द्वेषमुलक वक्तव्ये (Hate speech), सामाजिक हिंसाचारासाठी चिथावणी देणारे वक्तव्ये केली जात असताना देशाच्या पंतप्रधानांचे मौन धक्कादायक असल्याची टीका सोनिया गांधी, शरद पवार यांच्यासह देशातील 13 विरोधी पक्षांच्या नेत्यांनी केली.(13 opposition leader criticize to PM Modi)
देशात सामाजिक हिंसाचाराचे आवाहन करणारे प्रक्षोभक वक्तव्ये केली जातात. मात्र या वक्तव्यांवर देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अवाक्षरही काढले नाही. हे त्यांचे मौन धक्कादायक आहे. तसेच सत्ताधाऱ्यांकडून आणि प्रशासनाकडून जमावाला अभय दिले जात असल्याची टीका देशातील 13 विरोधी पक्षाच्या प्रमुखांनी केली. तसेच या घडलेल्या हिंसक घटनांमधील संशयितांवर तातडीने कारवाई करण्याची मागणी संयुक्त निवेदनाद्वारे देण्यात आली. ( Hate speech increased, opposition leader criticize to PM)
सध्या देशात खाद्यपदार्थ, धार्मिक श्रध्दा, पोषाख, सण-उत्सव आणि भाषा अशा विविध मुद्द्यांवर सत्ताधारी गटाकडून समाजात फुट पाडण्याचा प्रकार केला जात आहे. तर याला सत्ताधारी आणि प्रशासनाकडून अभय दिले जात आहे. त्यातच देशभरात प्रक्षोभक वक्तव्ये केली जात आहेत. त्यावर पंतप्रधान मोदी यांचे मौन धक्कादायक आहे. (Modi are silence on hate speech)
देशात विविध ठिकाणी द्वेषमुलक वक्तव्ये केली जात आहेत. मात्र त्यांना सत्ताधरी गटाकडून संरक्षण दिले जाते. त्यामुळे देशात असे प्रकार वाढत चालले आहेत. त्यामुळे द्वेषमुलक भाषणांद्वारे लोकांच्या भावना भडकवल्या जात आहेत. त्यातच सशस्र धार्मिक मिरवणूका काढल्या जात आहेत. त्यामुळे धार्मिक हिंसा भडकवली जात असल्याची टीका विरोधी पक्षांनी केली आहे.
संयुक्त निवेदनावर 13 विरोधी पक्षांच्या सह्या-
या संयुक्त निवेदनावर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार, काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी, मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टीचे सिताराम येच्युरी, पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री आणि तृणमुल काँग्रेसच्या प्रमुख ममता बॅनर्जी, द्रमुकचे प्रमुख आणि तामिळनाडूचे मुख्यमंत्री एम. के स्टॅलिन, झारखंडचे मुख्यमंत्री आणि झारखंड मुक्ती मोर्चाचे हेमंत सोरेन, नॅशनल काँन्फ्रेन्सचे फारूख अब्दुल्ला, राजदचे प्रमुख तेजस्वी यादव, भाकपचे महासचिव डी राजा या नेत्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका करत संयुक्त निवेदनावर 13 विरोधी पक्षांच्या नेत्यांनी सह्या केल्या आहेत. (13 opposition leader criticize to PM Modi, soniya Gandhi and Sharad pawar include )
शिवसेना, आप, सप, बसपाच्या नेत्यांची संयुक्त निवेदनाकडे पाठ
देशात वाढत चाललेले द्वेषमुलक वक्तव्ये आणि सामाजिक हिंसाचारासाठी चिथावणी देण्याचे प्रकार यांमुळे विरोधी पक्षांच्या 13 नेत्यांनी दिलेल्या निवेदनाकडे शिवसेना, आप, सप आणि बसपाच्या नेत्यांनी पाठ फिरवली आहे. त्यामुळे देशात विरोधी पक्षांची आघाडी बनवण्याच्या प्रयत्नाला हा तडा असल्याची चर्चा सुरू आहे.