PM Modi On Budget 2024 | विकसित भारताची शाश्वती म्हणजे अर्थसंकल्प 2024 - पंतप्रधान मोदी

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सितारामन यांनी संसदेत मांडलेल्या अर्थसंकल्पातून काय मिळालं यासंदर्भात प्रतिक्रिया दिली.;

Update: 2024-02-01 10:22 GMT

Antarim Budget 2024 : संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन नुकतच पार पडलं असून आज गुरुवारी अर्थमंत्री निर्मला सितारामन यांनी सभागृहात अर्थसंकल्प सादर केला. या अर्थसंकल्पात केंद्रस्थानी युवक, महिला, शेतकरी आणि सामान्य माणूस इत्यादी दिसून आले. त्याचबरोबर या अर्थसंकल्पामध्ये अनेक महत्वाच्या योजनांचा उल्लेख करण्यात आला. परंतु नोकरदार वर्गाला अपेक्षित असं समाधान वाटलं नाही. कर सवलतीसाठी नौकरदार वर्गाला येत्या काळात सादर होणाऱ्या पूर्ण अर्थसंकल्पाची प्रतिक्षा करावी लागणार आहे कारण या अर्थसंकल्पात कोणताही बदल करण्यात आलेला नाही.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी निर्मला सितारामन यांच्याकडून अर्थसंकल्प सादर झाल्यानंतर निर्मला व त्यांच्या टीमचे अभिनंदन केले. त्याचबरोबर भारताचा पाया मजबुत करणारा हा अर्थसंकल्प असुन विकसित भारताच्या चार स्तंभांवर आधारीत हा अर्थसंकल्प आहे. वित्तीय तुट नियंत्रणात आली असून २ कोटी नवी घरे बांधण्याचे लक्ष्य ठेवण्यात आले आहे, शेतकऱ्यांसाठीही महत्वपूर्ण आणि मोठे निर्णय घेण्यात आले आहेत. शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढेल आणि खर्च कमी होईल. हा देशाच्या भविष्याचा अर्थसंकल्प आहे, असंही त्यांनी ठामपणे सांगितलं. अर्थसंकल्पात २०४७ पर्यंत विकसित भारताची गॅरंटी आहे. त्यात विश्वास भरलेला आहे, असंही मोदी यावेळी म्हणाले.

पंतप्रधान मोदी आणि अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांचा मी आभारी आहे. या अर्थसंकल्पात सर्व क्षेत्रांचा समावेश आहे तसेच या अर्थव्यवस्थेच्या बाबतीत आपला देश जगात एक आत्मविश्वासपूर्ण देश झाला आहे, असे केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू म्हणाले.

Tags:    

Similar News