Video: मी नारायण तातू राणे ईश्वर साक्ष शपथ घेतो की...
नारायण राणे यांनी घेतली शपथ
आज मंत्रीमंडळाचा विस्तार होत आहे. या विस्तारात खासदार नारायण राणे यांनी कॅबिनेट मंत्री पदाची शपथ घेतली. देशाचे राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी त्यांना पद आणि गोपनियतेची शपथ दिली.
महाराष्ट्रातून मोदी सरकारच्या नवीन मंत्रीमंडळात नारायण राणे, कपिल पाटील, डॉ भारती पवार, डॉ भागवत कराड यांना स्थान देण्यात आले आहे.