PM Modi Cabinet: 13 वकील, 6 डॉक्टर, 5 इंजिनिअर असं आहे मोदींचं नवीन मंत्रीमंडळ

Update: 2021-07-07 12:01 GMT

आज मोदी सरकारचा मंत्रीमंडळ विस्तार होत आहे. आगामी विधानसभा निवडणुका आणि जातीचं समीकरण लक्षात घेता, मोदी सरकारने आपल्या मंत्रिमंडळात मोठे फेरबदल केले आहेत. ज्योतिरादित्य सिंधिया, वरूण गांधी, अनुप्रिया पटेल यांच्यासारख्या युवा चेहऱ्यांची एंट्री होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. तर काही मंत्र्यांचं प्रमोशन आणि काहींना घरचा रस्ता दाखवण्याची शक्यता आहे.

मिळालेल्या माहितीनुसार मंत्र्यांच्या नव्या मंत्रिमंडळात 4 माजी मुख्यमंत्री, राज्य सरकारचे 18 माजी मंत्री, 39 माजी आमदार यांचा समावेश असेल. व्यवसायाच्या आधारे मंत्रिमंडळात 13 वकील, 6 डॉक्टर, 5 अभियंता, 7 नोकरशहा असतील. शिक्षणाबद्दल बोलताना सात मंत्री पीएचडीधारक (PHD), 3 एमबीए पदवी धारक (MBA) आणि 68 मंत्री पदवीधारक (Graduate) आहेत.

मोदींच्या मंत्रिमंडळात महिलांची संख्या

केंद्रीय मंत्रिमंडळात महिला सदस्यांची संख्या 11 असणार आहे. यामध्ये दोन महिला कॅबिनेट मंत्रीपदावर असणार आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, फेरबदल केल्यानंतर तयार होणाऱ्या मंत्रिमंडळात 14 मंत्र्यांचं वय 50 वर्षापेक्षा कमी आहे. मंत्रिमंडळात असलेल्या मंत्र्यांचे वय सरासरी 58 वर्ष इतकं आहे.

मोदींची उत्तर प्रदेशच्या निवडणूकांवर नजर..

अनुसूचित जाती (SC) कडून मंत्रिमंडळात 12 मंत्री असणार आहेत. ज्यात 2 कॅबिनेट मंत्री असतील. तर अनसूचित जमातीमधून इतर 8 मंत्री असणार आहेत ज्यात तिघांना कॅबिनेट मंत्रिमंडळात स्थान मिळेल. या पद्धतीनं मंत्रिमंडळात ओबीसी समाजातील 27 मंत्री असतील... ज्यात 5 जणांना कॅबिनेट मंत्रीपद मिळणार आहे. अल्पसंख्याक वर्गातून 5 मंत्री असतील ज्यातून 3 जागा कॅबिनेटमध्ये असणार आहे.

Tags:    

Similar News