गेल्या काही दिवसांपासून चर्चेत असलेल्या मोदी सरकारचा केंद्रीय मंत्रीमंडळाचा विस्तार येत्या दोन दिवसात होण्याची शक्यता आहे. पुढील दोन दिवसात राष्ट्रपती भवनात पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्या उपस्थितीत हा शपथविधी सोहळा पार पडणार आहे. हा मोदी सरकारच्या दुसऱ्या टर्ममधील पहिला विस्तार असून मोदी सरकार मधील जवळपास 24 मंत्रीपदाच्या जागा रिक्त आहेत. Union Cabinet expansion
महाराष्ट्रातून कोण?
नारायण राणे पत्नीसह दिल्लीत दाखल झाले आहेत. तसंच महाराष्ट्रातून खासदार कपिल पाटील यांच्या नावाची चर्चा आहे. तर दुसरीकडे ज्योतिरादित्य शिंदे, सर्वानंद सोनोवाल, पश्चिम बंगालचे शांतनू ठाकूर, लोकजनशक्ती पक्षाचे पशुपती पारस दिल्लीत दाखल झाले आहेत. त्यामुळं ही नाव निश्चित समजली जात आहेत.
ही आहे संभाव्य मंत्र्यांची यादी?
नारायण राणे (Narayan Rane)
पशुपती पारस (Pashupati Paras)
अनुप्रिया पटेल (Anupriya Patel)
पंकज चौधरी (Pankaj Chowdhury)
राहुल कस्वान (Rahul Kaswan)
सी. पी. जोशी (CP Joshi)
संकल्पदीप राजभर (sakaldeep Rajbhar)
रंजन सिंह राजभर (Ranjan Singh Rajkumar)
रीटा जोशी (Rita Bahuguna Joshi)
रामशंकर कथेरिया (Ramshankar Katheria)
ज्योतिरादित्य शिंदे (Jyotiraditya Scindia)
सर्वानंद सोनोवाल Sarbananda Sonowal
वरुन गांधी Varun Gandhi
आरसीपी सिंह RCP Singh
लल्लन सिंह Lallan Singh