भाजप देशात जातीयवादाचे विष कालवत आहेत: शरद पवार

समाजात सलोखा राहावा, याची जबाबादारी केंद्र सरकारची असते. पण सत्ताधारी भाजपच देशात जातीयवादाचे विष कालवत आहेत, असा घणाघाती गंभीर आरोप शरद पवार यांनी केला आहे. रांचीत झालेल्या सभेत शरद पवार बोलत होते.

Update: 2021-03-07 12:45 GMT

झारखंडमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे राज्यस्तरीय अधिवेशनात राष्ट्रवादीचे प्रमुख नेते उपस्थित होते. त्यांच्यासोबत कमलेश सिंह हे झारखंडच्या हुसैनाबाद विधानसभा मतदारसंघातील आमदार उपस्थित होते. ते मुख्यमंत्री हेमंत सोरेन भेट घेऊन मुंबईला रवाना होतील.

शेतकऱ्यांचे १०० दिवसांपासून आंदोलन सुरू आहे. पंतप्रधान मोदींना विदेश दौऱ्यांसाठी वेळ आहे. पश्चिम बंगालमध्ये प्रचारासाठी वेळ आहे. पण २० किमी अंतरावर असलेल्या आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांची भेट घेण्यासाठी मोदींना वेळ नाहीए, अशी खरमरीत टीकाही शरद पवार यांनी केली आहे.

बिरसा मुंडा यांच्या पवित्र भूमीत आलो, हे आपले भाग्य आहे. क्रिकेट मोठ्या उंचीवर नेण्याचं श्रेय धोनीचं आहे. राहुल द्रविड हा कर्णधारपद सोडण्यासाठी आला असताना आपण सचिन तेंडुलकरला कर्णधारपद घेण्यास सुचवलं. पण सचिन तेंडुलकरने धोनीचं नाव सुचवलं. धोनीच्या भूमीत आल्याचा आपल्याला अभिमान आहे, असं शरद पवार म्हणाले.


पश्चिम बंगालमध्ये एका महिला मुख्यमंत्री आहे. पण त्यांच्याविरोधात केंद्रीय संस्थांचा वापर केला जातोय. त्यांच्या हातात सत्ता येऊ नये, हे आपण बघितलं पाहिजे, असं पवार म्हणाले.

युरोपात करोना प्रादुर्भाव वेगाने वाढत आहे. त्याचबरोबर देशातही करोनाचे रुग्ण वाढत आहे. अशा संकटावेळी सरकारची जबाबदारी मोठी असते, असं पवार म्हणाले. महाराष्ट्राच्या विकासात झारखंड, बिहार, मध्य प्रदेश आणि उत्तर प्रदेशच्या नागरिकांचे योगदान आहे, असं पवारांनी सांगितलं.

पंतप्रधान मोदींनी भाजपच्या कार्यकर्त्यांना थाळी वाजवण्यास सांगितलं. नागरिकांना जागरुक करण्याचं आवाहन केलं. पण आम्ही थाळी वाजवणारे नाही. त्या ताटात जेवण कसे मिळेल, याची चिंता करणारे आहोत, असा टोला शरद पवार यांनी पंतप्रधान मोदींना लगावला.

Tags:    

Similar News