शिंदेसोबत गुंडाचा फोटो; संजय राऊतांनी ट्विटद्वारे केला शिंदेवर हल्लाबोल..!

Update: 2024-02-06 09:27 GMT

खासदार संजय राऊत यांनी एक खळबळजनक फोटो आपल्या एक्स अकाउंट वरून ट्वीट करत शिंदे सरकारवर हल्लाबोल चढवला आहे. पुण्यातील गुंड निलेश घायवळ याचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सोबतचा हा फोटो आहे. गुंड आणि दरोडेखोरांनी गुंडांसाठी चालवलेलं हे राज्य असं त्यांनी फोटो ट्वीट करत म्हटलंय. हे महाशय कोण आहेत ? त्यांचं नेमकं कतृत्व काय आहे? याचा खुलासा गृहमंत्री आणि पुणे पोलीस आयुक्तांनी करावा असंही संजय राऊतांनी यावेळी म्हटलेले आहे. पुणे संस्कृती आणि विद्येचं माहेरघर होतं आज त्याची काय अवस्था करून ठेवली आहे, मोदी शहा यांच्या राज्यकर्त्या टोळीने..! अशा पध्दतीचं ट्विट संजय राऊत यांनी आपल्या एक्स खात्यावरून केलं आहे.


Tags:    

Similar News