Parbhani Loksabha | संजय जाधवांची जानकरांवर टीका...! काय म्हणाले? वाचा

Update: 2024-04-21 09:15 GMT

Parbhani Loksabha | संजय जाधवांची जानकरांवर टीका...! काय म्हणाले? वाचा

परभणी लोकसभा मतदारसंघात ठाकरे गटाचे उमेदवार संजय जाधव यांच्या विरोधात महायुतीकडून राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष महादेव जानकर उभा ठाकले आहेत. परभणी शहरात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भव्य सभा झाल्यानंतर खासदार संजय जाधव यांनी महादेव जानकर यांच्यावर धनगर समाजाच्या आरक्षणावरून टीका करत निशाणा साधला आहे.

भारतीय जनता पक्षाची राज्यात आणि केंद्रात सत्ता असूनही धनगर समाजाला आरक्षण का मिळाले नाही? असा सवाल संजय जाधव यांनी महायुतीचे उमेदवार महादेव जानकर यांना केला आहे. त्यातच आता दोन्ही उमेदवारांकडून एकमेकांवर आरोप-दोषारोप केले जात असल्याचे पहायला मिळत आहे.

परभणी लोकसभेची ही लढत फारच चुरशी ठरणार असल्याच्या चर्चाही सध्या मतदारसंघात जोर धरत आहेत.

दरम्यान प्रसारमाध्यमांशी बोलताना संजय जाधव म्हणाले की, प्रत्यक्षात धनगर समाजावर अन्याय कुणी केला? राज्य आणि केंद्र दोन्हीकडे भाजपची सत्ता असतानाही धनगर समाजाला का आरक्षण मिळु शकले नाही. महादेव जानकर यांना शरद पवार गटाकडून माढामधून उमेदवारी जाहीर करण्यात आली होती. पण जानकर एका रात्रीत महायुतीमध्ये सामील झाले. जानकरांची निष्ठा कुण्या एका ठिकाणी नाही, असं म्हणत जाधव यांनी जानकरांसह भाजपवर सडकून टीका केली आहे.

जानकरांकडे काही नाही, मग निवडणूकीत पैसे येतात कुठून?

पुढे संजय जाधव म्हणाले, जानकर सांगतात की, माझ्याकडे काहीच नाही, मी स्टेशनला झोपतो आणि दुसरीकडे निवडणुकीत लाखो-कोट्यवधी रूपये खर्च करतात. मग हे पैसे आले कुठून? असा सवालही जाधव यांनी यावेळी विचारला आहे. दरम्यान, परभणीच्या पालम तालुक्यातील चाटोरी येथे गावकऱ्यांशी संवाद साधत असताना संजय जाधव बोलत होते.

Tags:    

Similar News

Kamla ahead of Trump?