राज्यातील जिल्हा परिषदेच्या निवडणूका जाहीर, पंकजा मुंडे न्यायालयात जाणार

Update: 2021-06-23 03:50 GMT

राज्यातील धुळे, नंदुरबार, अकोला, वाशीम व नागपूर या 5 जिल्हा परिषदांसह 33 पंचायत समित्यांमध्ये रिक्त झालेल्या पदांच्या पोटनिवडणुकीसाठी 19 जुलै 2021 ला मतदान होणार आहे. राज्य निवडणूक आयोगाने तशी घोषणा केली आहे. स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणूकीत ओबीसी आरक्षण सर्वोच्च न्यायालयाने रद्द केल्यानं या निवडणूकीत ओबीसींना आरक्षण मिळणार नाही. यावरुन भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे.

या संदर्भात त्यांनी फेसबूकवर पोस्ट लिहिली आहे. त्या म्हणतात... धुळे, नंदुरबार सह राज्यातील पाच जिल्हा परिषदा आणि पंचायत समितीच्या पोटनिवडणुका लागल्याचे समजले. ओबीसींच्या राजकीय आरक्षणाचा विषय अत्यंत संवेदनशील होत असताना या निवडणूका जाहीर होणं हा ओबीसींवर घोर अन्याय आहे. ओबीसींच्या राजकीय आरक्षणाचा विषय मार्गी लागल्याशिवाय निवडणूका होऊ देणार नाही. असे वक्तव्य राज्य सरकारमधील मंत्र्यांनी देखील केले होते.

न्यायालयात जाणार आम्ही तर याविरूध्द न्यायालयात धाव घेणार आहोत. तथापि, राज्य शासनाने न्याय देण्याची भूमिका तत्काळ घेण्याची गरज आहे. राजकीय आरक्षणाचा विषय मार्गी लागेपर्यंत या निवडणूका न घेण्याची भूमिका राज्य शासनाने देखील मांडण्याची आवश्यकता आहे. तसेच आमच्या समवेत कोर्टात धाव घेण्याची आवश्यकता आहे.

Tags:    

Similar News