courtesy social media
ओबीसी आरक्षणाच्या मागणीसाठी भाजपने आज राज्यभरात चक्काजाम आंदोलन केले. यावेळी पंकजा मुंडे यांनी राज्य सरकारवर जोरदार हल्ला केला. सरकारमधले मंत्री आंदोलनाची भाषा करत आहेत, मंत्र्यांनी आंदोलन नाही करायचं तर निर्णय घ्यायचा असा टोला त्यांनी लगावला. तसेच ओबीसी आरक्षण मिळत नाही तोपर्यंत निवडणूक होऊ देणार नाही असाही इशारा त्यांनी दिला.