पालघर साधु हत्याकांड प्रकरण न्यायप्रविष्ठ असताना भाजपशासित राज्यातील साधु-पुजारी हत्याकांडाववर मुग गिळून बसणाऱ्या भाजपनं आता राजकारणाची नीच पातळी गाठल्याचा आरोप कॉंग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी केला आहे . एप्रिल २०२० मध्ये पालघरमधील गडचिंचले गावात साधूंच्या मॉबलिंचिंग प्रकरणात अद्यापपर्यंत २२५ अटक झाल्या आहेत. १५४ हत्याप्रकरणी व ७५ जमावबंदी आदेशाचे उल्लंघन प्रकरणी! निष्काळजीपणा दाखविल्याबद्दल पोलीसांवरही कारवाई करण्यात आली.
सदर तपास सीआयडीकडे आहे व न्यायालयीन प्रक्रिया सुरू आहे, असं सावंत म्हणाले. प्रकरण न्यायप्रविष्ठ असताना सात महिन्यांनी पुन्हा भाजपा यावर राजकारण करत आहे. सदर गडचिंचले गाव हा भाजपाचा गड आहे. गेले दहा वर्षे भाजपा चा सरपंच आहे. आरोपी क्र. ६१ व ६५ यांच्या समवेत बहुसंख्य अटक झालेले आरोपी हे भाजपाचे आहेत. भाजपाच्या संबंधित आरोपींना वाचवण्यासाठीच सीबीआय चौकशी मागितली जात आहे.
देशपातळीवर भाजपा राज्यात साधूंच्या हत्या झाल्या. उत्तर प्रदेश मध्ये तसेच कर्नाटक मध्ये तीन पुजारींच्या हत्या झाली. तेथे मात्र ही भाजपा ची मंडळी गप्प बसतात. भाजपाचा दांभिकपणा व धर्माचा राजकारणासाठी उपयोग करण्याची हीन मानसिकता निषेधार्ह आहे. भाजपाच्या गलिच्छ राजकारणाचा जाहीर निषेध करत असल्याचं सचिन सावंत यांनी म्हटलं आहे.