...अन्यथा लोकशाहीचा आत्माच नष्ट होईल, पृथ्वीराज चव्हाण यांनी व्यक्त केली भीती

काँग्रेसच्या चिंतन शिबीरानंतर काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि राज्याचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी पुन्हा एकदा काँग्रेस पक्षावर नाराजी व्यक्त केली आहे.

Update: 2022-06-03 02:55 GMT

यंदा झालेल्या पाच राज्यातील निवडणूकांमध्ये काँग्रेसने सपाटून मार खाल्यानंतर राजस्थानमधील उदयपुरमध्ये काँग्रेसचे चिंतंन शिबीर पार पडले. या शिबीरानंतर काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि राज्याचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी काँग्रेसवर टीका केली आहे. ते टाईम्स ऑफ इंडियाच्या पॉडकास्टमध्ये बोलत होते.

यावेळी पृथ्वीराज चव्हाण म्हणाले की, मी जेव्हा दिल्लीत असतो. तेव्हा माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह आजारी असतानाही त्यांची वेळ मागितली तरी ते लगेच भेटतात. काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी भेटतात. मात्र नेते राहुल गांधी यांची भेट होत नाही. राहुल गांधी गेल्या चार वर्षांपासून भेटले नसल्याची खंत पृथ्वीराज चव्हाण यांनी यावेळी व्यक्त केली. तसेच पुढे बोलताना पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, अशा प्रकारे पक्षात अडचणी असतील तर संवाद सुलभ होऊ शकत नाही.

उदयपुरमध्ये झालेले काँग्रेसचे चिंतन शिबीर हे पक्षात निर्माण झालेल्या अडचणी आणि पक्षासमोर असलेल्या समस्यांवर चर्चा करण्यासाठी आयोजित करण्यात आले असल्याचे मान्य करण्यात आले होते. मात्र त्या शिबीरात कोणीतरी असा निर्णय घेतला की काँग्रेसने चिंतन किंवा आत्मपरिक्षण करण्याची गरज नाही. हे शिबीर नवशिबीर होतं. पण या शिबीरात कोणालाच पक्षाच्या शवविच्छेदन आणि भविष्याकडे पाहण्याची गरज वाटली नाही, अशी खंत पृथ्वीराज चव्हाण यांनी व्यक्त केली.

काँग्रेसला आत्मचिंतनाची गरज

पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, काँग्रेसने प्रामाणिकपणे आत्मचिंतन करायला हवे. मात्र यामध्ये जबाबदारी निश्चित करताना कोणाला लटकवून न ठेवता एक चुक पुन्हा होणार नाही याची काळजी घ्यायला हवी. तसेच आगामी काळातील 12 राज्यांच्या विधानसभा निवडणूकींवर काँग्रेसने लक्ष द्यायला हवे. त्यासाठी व्यापक पातळीवर युती करणे गरजेचे आहे. कारण यातूनच मोठी कामगिरी करणे शक्य आहे. त्याबरोबरच 2024 मध्ये मोदींना सत्तेपासून दुर ठेवायचं असेल तर काँग्रेसने यासाठी पुढाकार घेतला पाहिजे. अन्यथा 2024 मध्येही मोदी सरकारचा पराभव झाला नाही तर उदारमतवादी लोकशाहीचा आत्माच नष्ट होईल, अशी भीती पृथ्वीराज चव्हाण यांनी व्यक्त केली आहे.

Tags:    

Similar News