उंदीर म्हणत राज ठाकरे यांना पुन्हा डिवचले
राज ठाकरे यांनी आयोध्या दौरा घोषित केल्यानंतर भाजप खासदार ब्रिजभुषण सिंह यांनी या दौऱ्याला विरोध दर्शवत चलो आयोध्येचा नारा दिला आहे. त्यामुळे राज ठाकरे यांचा दौरा वादात सापडला असतानाच ब्रिजभुषण सिंह यांनी आणखी एक खळबळजनक वक्तव्य केले आहे.
राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी 2008 मध्ये उत्तर भारतीयांवर केलेल्या हल्ल्याबद्दल राज ठाकरे यांनी उत्तर भारतीयांची माफी मागावी, अशी मागणी भाजप खासदार ब्रिजभुषण सिंह यांनी केली आहे. त्यातच ब्रिजबुषण सिंह यांनी पत्रकार परिषदेत इतर राज्यातील नागरिक महाराष्ट्रात गेल्यानंतर दुय्यम नागरिक बनुन भीतीच्या छायेत राहत असल्याचा दावा केला. त्यामुळे पुन्हा एक नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.
राज ठाकरे यांनी आयोध्या दौरा जाहीर केल्यानंतर भाजप खासदार ब्रिजभुषण सिंह यांनी या दौऱ्याला विरोध दर्शवला आहे. तर राज ठाकरे यांच्या दौऱ्याचा विरोध करण्यासाठी ब्रिजभुषण सिंह यांनी चलो आयोध्येचा नारा दिला आहे. तर राज ठाकरे यांनी उत्तर भारतीयांवर केलेल्या हल्ल्यांबद्दल माफी मागावी, असे ब्रिजभुषण सिंह यांनी म्हटले आहे. ते पत्रकार परिषदेत बोलत होते.
यावेळी बोलताना ब्रिजभुषण सिंह म्हणाले, देशातला कोणत्याही राज्याचा नागरिक जेव्हा महाराष्ट्रात जातो. त्यावेळी तो नागरिक भीतीच्या छायेत जगतो आणि तो दुय्यम दर्जाचा नागरिक बनुन महाराष्ट्रात राहतो. तसेच पुढे बोलताना ब्रिजभुषण सिंह यांनी सांगितले की, मी महाराष्ट्राच्या भुमी आणि नागरिकांना प्रणाम करतो. माझे त्यांच्याशी किंवा कुठल्याही व्यक्तीशी वैर नाही. तसेच ही लढाई सत्ता मिळवण्यासाठी नाही तर अन्यायाविरोधातील आहे, अशी भुमिका ब्रिजभुषण सिंह यांनी मांडली.
माफी मागितल्याशिवाय आयोध्येत पाय ठेऊ देणार नाही.( Brijbhushan singh warn to Raj Thackeray)
राज ठाकरे यांनी 2008 मध्ये उत्तर भारतीयांविरोधात केलेल्या हल्ल्याबद्दल राज ठाकरे यांनी चुकून किंवा जाणून बुजून केलेल्या हल्ल्याबद्दल मी उत्तर भारतीयांची माफी मागतो एवढंच म्हणावं. तसंच देशातील साधुसंतांना सांगा की, मी जाती, धर्म आणि प्रांताच्या आधारावर भेदभाव करणार नाही. राज ठाकरे यांनी हे सांगितले तर, मी वचन देतो की यामुळे उत्तर भारतीयांच्यामध्ये राज ठाकरे यांचा सन्मानच होईल, असं मत ब्रिजभुषण सिंह यांनी व्यक्त केले.
ब्रिजभुषण सिंह पुढे म्हणाले, आम्ही त्यांना कोणत्याही प्रकारचा चंद्र किंवा तारे मागितले नाहीत. शक्य न होणारी अट ठेवली नाही. त्यामुळे राज ठाकरे यांनी उत्तर भारतीयांची माफी मागावी. अन्यथा ५ जूनला राज ठाकरे यांना आयोध्येत येऊ देणार नाही. तसेच आयोध्या पुर्ण पॅक असणार आहे. त्यामुळे जर राज ठाकरे यांनी माफी मागितलीच नाही तर राज ठाकरे यांना आयोध्येत पाऊल ठेऊ देणार नसल्याचे वक्तव्य ब्रिजभुषण सिंह यांनी केले.
राज ठाकरेंचा पुन्हा एकदा उंदीर असा उल्लेख (Brijbhushan singh said mouse to Raj Thackeray)
ब्रिजभुषण सिंह (BrijBhushan Singh) यांनी राज ठाकरे यांचा पुन्हा एकदा उंदिर असा उल्लेख केला आहे. त्यामध्ये ब्रिजभुषण सिंह म्हणाले की, राज ठाकरे बिळात राहतात. ते बिळातून बाहेर येत नाहीत. त्यातच राज ठाकरे आतापर्यंत बाहेर आले नाहीत. त्यामुळे ते पहिल्यांदाच आयोध्या दौऱ्यावर आल्याने राज ठाकरे यांचा विरोध करीत आहे. तर ५ जून रोजी मी राज ठाकरे यांना आयोध्येत प्रवेश करू देणार नाही म्हणजे नाही. तसेच घेतलेली भुमिका योग्य की अयोग्य ते काळच ठरवेल, असं मत ब्रिजभुषण सिंह यांनी व्यक्त केले.