अधिकाऱ्यांचं मनोबल खच्चीकरण करण्याचं कंत्राट विरोधी पक्षानं घेतलयं काय? डॉ. जितेंद्र आव्हाड
फोन टॅपिंगवरुन राज्याचं राजकारण ढवळून निघत असताना सत्ताधारी विरोधकांचे आरोप प्रत्यारोप सुरुच आहेत. मुख्य सचिवांच्या अहवालावर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी भाष्य केल्यानंतर गृहनिर्माण मंत्री डॉ. जितेंद्र आव्हाड यांनी विरोधकांनी अधिकाऱ्यांचं मनोबल खच्चीकरण करण्याचं कंत्राट विरोधी पक्षानं घेतलयं काय? असा सवाल उपस्थित केला आहे.
पोलिस अधिकारी रश्मी शुक्ला यांना दोषी ठरवण्याऱ्या मुख्य सचिवांच्या अहवालावर बोलताना फडणवीस म्हणाले होते की, मी कुंटे यांना मी गेल्या अनेक वर्षांपासून ओळखतो. ते साधे आणि सरळमार्गी अधिकारी आहे. त्यांनी हा रिपोर्ट तयार केलाच नाही. जितेंद्र आव्हाड आणि नवाब मलिक यांनी हा अहवाल तयार केला असेल आणि त्यावर कुंटे यांनी सही केली असेल. असाच हा अहवाल आहे.
पण याकडे मी सकारात्मक दृष्टीकोनातून पाहतो. कि जितेंद्र आव्हाड अहवाल लिहू शकतात. एवढं देवेंद्र फडणवीस यांनी मान्य केले तेच खुप झालं.
— Dr.Jitendra Awhad (@Awhadspeaks) March 26, 2021
सोशल मिडीयाच्या माध्यमातून व्यक्त होताना त्यावर आव्हाड म्हणाले, राज्याचे मुख्य सचिव सिताराम कुंटे यांनी मुख्यमंत्र्यांना दिलेला अहवाल जितेंद्र आव्हाड यांनी लिहिलेला आहे. असा आरोप राज्याचे माजी मुख्यमंत्री कुशाग्र बुद्धीचे देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. त्यांचा यामागील हेतू मला कळत नाही. हा हास्यास्पद आरोप आहे. याबद्दल माझ्या मनात शंका नाही. सिताराम कुंटे यांच्या प्रशासकीय सेवेतील अनुभवाचा आणि त्यांच्या प्रामाणिक पणाचा या वाक्यातून अपमान झाला आहे. एकंदर पोलीस खात्यातील अधिकारी व प्रशासकीय सेवेतील अधिकारी यांचं मनोबल खच्चीकरण करण्याच कामच जणू विरोधी पक्षाकडून सुरु आहे.पण याकडे मी सकारात्मक दृष्टीकोनातून पाहतो. कि जितेंद्र आव्हाड अहवाल लिहू शकतात. एवढं देवेंद्र फडणवीस यांनी मान्य केले तेच खुप झालं.