आरक्षणासंदर्भात अधिवेशनात केवळ चर्चा होईल आ. भाई जागताप यांच आरक्षणावर मोठं विधान
हिवाळी अधिवेशनात मराठा आरक्षणावर केवळ चर्चाच होऊ शकते, पण मराठा आरक्षण मिळणार नाही, असे सूचक मोठं विधान काँग्रेस आमदार भाई जगताप यांनी केलंय. कारण मराठा आरक्षणावर अधिवेशनात पहिल्या दोन दिवसातच चर्चा घेण्याच आश्वासन सरकारनं दिलेलं होत. पण अधिवेशन सुरू झाल्या पासून अद्याप त्यावर चर्चा झाली नाही. दरम्यान आजच्या तारखेत चर्चा करण्याच सरकारकडून सांगण्यात आलं होतं. पण आजची चर्चेची वेळ निघून गेली असून आता यावर उद्या चर्चा होणार आहे. देवेंद्र फडणवीस यांनी आमचं सरकार आल्या नंतर मराठा आरक्षण, धनगर आरक्षण तात्काळ देऊ असे सांगितले होते. पण तेच देवेंद्र फडणवीस आरक्षणावर चर्चाही घेत नाहीत. मराठा आणि OBC समाजाला आरक्षणावर झुंजवत ठेवणे व स्वतःचे अपयश लपवण्याचा प्रयत्न हे सरकार करत आहे.