सावरकरांबद्दलच्या वक्तव्यामुळे ठाकरे गटाचा राहुल गांधींना इशारा ; पुन्हा बोललात तर आम्ही...

खासदारकी रद्द झाल्यानंतर झालेल्या पहिल्या पत्रकार परिषदेत काँग्रेसचे प्रमुख राहुल गांधी यांनी भाजपवर जोरदार टीका केली.;

Update: 2023-03-27 03:53 GMT

खासदारकी रद्द झाल्यानंतर झालेल्या पहिल्या पत्रकार परिषदेत काँग्रेसचे प्रमुख राहुल गांधी ( Rahul Gandhi) यांनी भाजपवर जोरदार टीका केली. राहुल गांधीं म्हणाले की मी घाबरलो नाही. "माझे नाव गांधी आहे, सावरकर ( Veer Savarkar ) नाही," असाही उल्लेख त्यांनी पत्रकार परिषदेत केला. सावरकरांबद्दलच्या त्यांच्या भूमिकेमुळे त्यांच्यावर भाजपकडून ( BJP ) सातत्याने टीका होत असते. शिवाय, उद्धव ठाकरेंनी रविवारच्या सभेत जाहीर भूमिका घेतल्यानंतर आज सामना अग्रलेखातूनही राहुल गांधींच्या सावरकरांबाबतच्या भूमिकेचा समाचार घेण्यात आला आहे.

रविवारच्या जाहीर सभेत उद्धव ठाकरे ( Uddhav Thackeray ) यांनी जाहीर मत व्यक्त केल्यानंतर आज सामनाच्या अग्रलेखातून राहुल गांधीं च्या विधान विरोधात ठाकरे गटाकडून भूमिका स्पष्ट करण्यात आली आहे. माझे आडनाव सावरकर नाही असे ठामपणे सांगून, मी घाबरलो नाही, असे मत राहुल गांधींनी अनेक वेळा व्यक्त केले आहे. मी तुरुंगात असलो तरीही मला प्रश्न पडत राहतील. पण राहुल गांधींनी आपल्या संपूर्ण पक्षाला आणि देशाला शूर बनवण्यासाठी उदाहरण देऊन नेतृत्व केले पाहिजे. "माझे आडनाव सावरकर नाही" असे वारंवार सांगून तुमची निर्भीडता वाढणार नाही किंवा वीर सावरकरांवरील जनतेचा विश्वास कमी होणार नाही. वीर सावरकर हे त्यांच्या जागी थोर आहेत "विनाकारण सावरकरांना 'माफिवीर' वगैरे दूषणे लावून लढण्याचे बळ कुणाला मिळणार नाही, आणि जर तुम्ही पुन्हा बोललात तर आम्ही गप्प बसनार नाही, असे अग्रलेखात म्हटले आहे.

सावरकरांनी जसे इंग्रजांविरुद्ध अनेक योद्धे उभे केले ,तसे "राहुल गांधींनी स्वतःच्या पक्षात तसे योद्धे तयार करावेत. राहुल गांधींना मानहानीच्या प्रकरणात अन्यायकारक शिक्षा दिली जात आहे, परंतु वीर सावरकरांची बदनामी करून ते जे सत्य पुढे नेण्याचा प्रयत्न करत आहेत त्यामुळे ते कधीही जिंकणार नाही. राहुल गांधी हे शहीदांच्याच कुटुंबात जन्मास आले. पण वीर सावरकर, त्यांचे बंधू बाबाराव सावरकर व त्यांच्या संपूर्ण कुटुंबाने राष्ट्रासाठी तितकाच महान त्याग केला. त्या बलिदानाकडे कुणीही दुर्लक्ष करू शकत नाही, हे ठाकरे गटाच्या या अग्रलेखातून आणि उद्धव ठाकरे यांच्या विधानांवरून स्पष्ट होते. .

Tags:    

Similar News