
ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावर भाजपने आज राज्यभरात तीव्र आंदोलन छेडले आहे. या पार्श्वभूमीवर काँग्रेसने देखील आता भाजप विरोधात रस्त्यावर उतरून आंदोलन केले आहे. ओबीसींचे राजकीय आरक्षण रद्द होण्यास केंद्र सरकार जबाबदार आहे असा आरोप करत काँग्रेसने हे आंदोलन केले आहे. तसेच ओबीसींना राजकीय आरक्षण मिळालेच पाहिजे अशी घोषणाबाजी काँग्रेस कार्यकर्त्यांनी केली.