पक्ष वाढवायचा असेल तर शरद पवार यांच्यावर टीका केल्याशिवाय पर्याय नाही - चंद्रकांत पाटील
शरद पवार यांच्यावर टीका केल्याशिवाय पर्याय नाही, त्यांच्यावर टीका-टिप्पणी केल्याशिवाय आमचा पक्ष वाढूच शकत नसल्याची कबुली भाजप प्रदेशाध्यक्ष आ. चंद्रकांत पाटील पुण्यात माध्यमांशी बोलताना दिली.;
राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार भेटल्यावर मी त्यांना वाकून नमस्कार करणारच, ती आमची संस्कृती आहे. मात्र, आम्हाला पश्चिम महाराष्ट्रात काम वाढवायचं असेल तर शरद पवार यांच्यावर टीका केल्याशिवाय पर्याय नसल्याचे मत चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केले आहे. ते आज पुण्यात माध्यमांशी बोलत होते.
याचसोबत 'शरद पवार यांच्यावर आम्ही टीका केली असली तरी, राजकारणात मैत्री असायलाच हवी. आम्हाला पश्चिम महाराष्ट्रात पक्ष वाढवायचा असेल तर शरद पवार यांच्यावर टीका केल्याशिवाय पर्याय नसल्याचं त्यांनी म्हटलं आहे.