गेल्या काही दिवसांपासून राणे विरुध्द महाविकास आघाडी सामना रंगला आहे. त्यातच राष्ट्रवादी आणि काँग्रेसला एमआयएमने ऑफर दिल्याने त्यावर प्रतिक्रीया देतांना नितेश राणे यांची जीभ घसरली. तर त्यांनी अभद्र भाषेचा वापर केल्याने मोठे वादंग निर्माण होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. नितेश राणे हे तुळजापुर येथे बोलत होते.
राणे पिता पुत्र आणि शिवसेना यांच्यात चांगलाच कलगितुरा रंगला आहे. तर राणे यांनी दिशा सालियन प्रकरणापासून ते विविध मुद्द्यांवर शिवसेनेची गोची करण्याचा प्रयत्न केला आहे. तर दुसरीकडे राणे यांच्यावर कारवाईचा बडगा उगारत शिवसेनेने राणे यांच्या नाकात दम आणला आहे. त्यापार्श्वभुमीवर एमआयएमने राष्ट्रवादी आणि काँग्रेसला आघाडीची ऑफर दिली आहे. त्यावरून पत्रकारांनी राणे यांना प्रश्न विचारला असता राणे यांनी वादग्रस्त वक्तव्य केले.
यावेळी नितेश राणे म्हणाले की, लग्नाचा प्रस्ताव एमआयएमने दिला आहे. त्यामुळे हा प्रस्ताव स्वीकारायचा की नाही हे त्यांनी ठरवावे. कारण त्यांच्या घरात कोण कोणासोबत झोपतंय हा आमचा प्रश्न नाही, असे वक्तव्य राणे यांनी केले. त्यामुळे राज्यातील राजकीय वातावरण पुन्हा एकदा तापण्याची शक्यता निर्माण झाली आहे. पुढे बोलताना राणे यांनी म्हटले की, नितेश राणे यांची जीभ घसरली, अभद्र भाषेचा वापर असे वक्तव्य नितेश राणे यांनी केले.
नितेश राणे यांनी केलेल्या वक्तव्यामुळे राज्यात नव्याने वादंग निर्माण होण्याची शक्यता आहे. तर संतोष परब हल्ला प्रकरणापाठोपाठ दिशा सालियन बदनामी प्रकरणी नितेश राणे अडचणीत आले असतानाच आता पुन्हा एकदा नितेश राणे यांनी वादग्रस्त वक्तव्य केल्याने त्यांच्यासमोरील अडचणी वाढण्याची शक्यता आहे.