शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार आगामी लोकसभा निवडणुकीत आमने-सामने असणार आहेत. शरद पवार गटाने सुळे (Supriya Sule) यांच्या प्रचाराला सुरुवात केली आहे. तर दुसरीकडे अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी आगामी लोकसभा निवडणुकीत सुनेत्रा पवारच अजित पवार गटाच्या उमेदवार असतील असे जाहीर केले आहे.
सुनेत्रा पवार या पहिल्यांदाच कोणत्याही प्रकारच्या निवडणुकीत स्वतः सहभागी होणार आहेत. याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट यांच्याकडून बारामतीत मोठी ताकद उभी केली जात आहे. सुनेत्रा पवार या राजकारणात सक्रिय नसल्या तरी प्रत्यक्ष राजकारण त्यांनी अगदी जवळून पाहिले आहे.
काटेवाडी गावात राबवलेल्या वेगवेगळ्या प्रकल्पामुळे त्यांची परिसरात चांगली इमेज तयार झाली आहे, त्यांनी राबविलेल्या प्रकल्पांना अनेक स्तरांवर सन्मानित केलं गेलेलं आहे.
आरोग्य, स्वच्छता महिला सक्षमीकरण या क्षेत्रात सुनेत्रा पवार यांनी वाखाण्याजोग काम केलं आहे, केलेलं काम हे राज्य पातळीवर किंबहुना देश पातळीवर घेऊन जाण्याची माझी इच्छा आहे असं सुनेत्रा पवार यांनी मॅक्स महाराष्ट्रला दिलेल्या मुलाखतीत सांगितला आहे.
पवार विरुद्ध पवार लढाई नसून हेइतिहासानं ठरवून दिलेलं आहे
मॅक्स महाराष्ट्रला दिलेल्या मुलाखतीत सुनेत्रा पवार यांना पवार विरुद्ध पवार अशी लढाई होणार याकडे तुम्ही कसे पाहता ? असा प्रश्न विचारला असता, हे इतिहास आणि ठरवून दिलेलं आहे, ही कौटुंबिक लढाई नसून राजकीय लढाई आहे असं सुनेत्रा पवार यांनी म्हटले आहे.
अजितदादांच्या पावलावर पाऊल टाकत बारामतीचा विकास करण्याची इच्छा आहे असं मत सुनेत्रा पवार यांनी व्यक्त केला आहे.