आमदार खासदार खरेदी करण्याचा नविन धंदा ; संजय राऊत भाजपवर आक्रमक

Update: 2024-04-15 10:03 GMT

दोन वर्षात सर्व भ्रष्टाचारी नेते भाजपात गेले. आमदार खासदार खरेदी करण्याचा नविन धंदा भाजपने सुरू केलाय, अशी आक्रमक टीका ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत(Sanjay Raut) यांनी केली आहे. माध्यमांशी बोलताना त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi)यांच्यावर निशाणा साधला आहे.

2014 आणि 2019 साली भाजपचे जाहीरनामे आपण पाहिले आहेत. या प्रत्येक जाहीरनाम्यात देशातील भ्रष्टाचार आणि भ्रष्टाचार करणाऱ्या व्यक्ती यांचा समूळ नायनाट करण्याची गॅरंटी नरेंद्र मोदी यांनी 2014 सालापासून दिली आहे. आता जाहीरनाम्यात पुन्हा एकदा गॅरंटी देण्यात आली आहे. ही गॅरंटी देताना गेल्या दीड-दोन वर्षात देशातील सर्व भ्रष्टाचारी नेते मोदी यांनी त्यांच्या पक्षात घेतले आहेत.आता भाजप हा भ्रष्टाचाऱ्यांचा पक्ष बनला आहे. तरीही मोदी सरकारचे भ्रष्टाचार नष्ट करण्याचे तुणतुणे खरेतर ढोंग सुरूच आहे, असं संजय राऊत म्हणाले.

दरम्यान, निवडणूक रोखे(Electoral Bonds) घोटाळ्यावरून देखील राऊतांनी टीका केली आहे. ''भारतातील निवडणूक रोखे घोटाळा हा जगातला सर्वात मोठा आणि भयंकर घोटाळा आहे. सरकारचा दबाव, त्यांनी दाखवलेली लालुच, कॉर्पोरेट कंपन्या, ठेकेदार, दारुवाले, औषधं बनवणाऱ्या कंपन्या यांना हजारो कोटींची कामं द्यायची आणि रोखे माध्यमातून पैसे गोळा करायचे. आमदार, खासदार खरेदी करायचे हा धंदा भाजपाने सुरू केला आहे. कोणत्याही व्यवहारांमध्ये पारदर्शकता नाही'' असाही आरोप संजय राऊत यांनी यावेळी केला

Tags:    

Similar News