आपला तो बाब्या दुसऱ्याचं ते कार्ट…

Update: 2021-09-04 09:27 GMT

कोव्हिड १९ चा प्रादुर्भाव काही केल्या कमी होत नाहीये. मुख्यमंत्री उध्दव ठाकरे तिसऱ्या लाटेचा धोका सांगत जनतेला कायम कोव्हिड निर्बंधांचे पालन करायला सांगत आहेत. परंतु मुख्यमंत्र्यांच्या सहकाऱ्यांनाच या निर्बंधांचा विसर पडलेला दिसतोय.

राज्याचे गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड यांनी शुक्रवारी ट्विटरवर त्यांच्या भिवंडी दौऱ्याचा व्हिडीओ पोस्ट केला. हा व्हिडीओ पोस्ट करताना त्यांनी म्हटलंय, "आज भिवंडीत कार्यकर्त्यांनी स्वागत केले."

या व्हिडीओमध्ये त्यांच्या स्वागतासाठी आलेली गर्दी पाहुन एकच म्हण तोंडी येते ती म्हणजे, "आपला तो बाब्या दुसऱ्याचं ते कार्ट!" गर्दी जमते म्हणुन सर्वसामान्यांना सरसकट लोकल प्रवेश बंद केलेल्या राज्य सरकार जितेंद्र आव्हाडांवर कारवाई करणार का? अशा आशयाच्या टीका आता आव्हाडांवर होऊ लागल्या आहेत.

आव्हाडांच्या या व्हिडिओवर आम आदमी पार्टीने टीका करताना, "'मविआ'चे मंत्री सातत्याने तिसरी लाट येण्याची भीती व्यक्त करतात व नागरिकांनी नियम पाळले नाहीत तर लॉकडाऊन करण्याची भीती घालत असतात. स्वतः मात्र बिनदिक्कतपणे कोविड निर्बंध पायदळी तुडवून प्रचंड गर्दीत रॅली काढतात, सभा घेतात. मंत्री, कार्यकर्ते व नागरीक यांना वेगवेगळे नियम आहेत का?" असे म्हटले आहे.

याशिवाय नेटकऱ्यांनीही आव्हाड यांच्यासह मुख्यमंत्री उध्दव ठकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनादेखील धारेवर धरले आहे. रामकृष्ण ढोकणे यांनी एक फेसबुक लाईव्ह मंत्रीमंडळासाठी करा असा सल्ला थेट मुख्यमंत्र्यांना देत राज्य सरकारवर टीका केली आहे.

Tags:    

Similar News