नवाब मलिकांना सर्वोच्च दणका,दुसऱ्यांदा याचिका फेटाळली

राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते (Ncp) आणि राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक(Nawab malik) यांना ईडीने अटक केली होती.त्याविरोधात दाखल केलेली याचिका मुंबई उच्च न्यायालयाने मागील महिन्यात फेटाळली होती.त्यानंतर त्यांनी सर्वोच्च न्यायालयात (supreme court) धाव घेतली,मात्र तिथेही मलिकांना दिलासा मिळाला नाही.हि याचिका न्यायालयाने फेटाळली आहे.;

Update: 2022-04-22 06:45 GMT

 राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते (Ncp) आणि राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक(Nawab malik) यांना ईडीने अटक केली होती.त्याविरोधात दाखल केलेली याचिका मुंबई उच्च न्यायालयाने मागील महिन्यात फेटाळली होती.त्यानंतर त्यांनी सर्वोच्च न्यायालयात (supreme court) धाव घेतली,मात्र तिथेही मलिकांना दिलासा मिळाला नाही.हि याचिका न्यायालयाने फेटाळली आहे.

ईडीने (ED)अटक केल्याच्या विरोधात मलिक यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली होती.ईडीची कारवाई चुकीची असल्याचा दावा त्यांनी केला होता.हे प्रकरण २२ वर्षापूर्वीचे असल्याचेही त्यांनी म्हटले होते.मात्र न्यायालयाने मलिक यांची ही याचिका फेटाळून लावली.त्यामुळे त्यांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती.

मुंबई उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशाविरूध्द ही याचिका होती. पण सर्वोच्च न्यायालयानेही याचिका फेटाळली आहे. ज्येष्ठ विधिज्ञ व काँग्रेसचे नेते कपिल सिब्बल यांनी न्यायालयात मलिकांची बाजू मांडली. 1993 मध्ये झालेल्या घटनेसाठी 2022 मध्ये अटक कशी केली जाऊ शकते, असा दावा सिब्बल यांनी केला. पण न्यायाधीश तसुर्यकां यांनी संबंधित न्यायालयाकडे जामीनासाठी अर्ज करण्यास सांगत आम्ही या टप्प्यावर त्यात ढवळाढवळ करणार नाही, असं सांगितलं.

Tags:    

Similar News