अमोल मिटकरींच्या भाषणावर ब्राम्हण महासंघ आक्रमक : मिटकरींनी फेटाळली माफीची मागणी
राष्ट्रवादी कॉंग्रेसचे (NCP)आमदार अमोल मिटकरी (Amol mitkari) यांनी सांगलीच्या इस्लामपूर येथील सभेत केलंलं भाषण सध्या चर्चेत आहे.मिटकरींनी ब्राम्हण समाजाच्या भावना दुखावल्याचा आरोप करत ब्राम्हण समाज आक्रमक झाला आहे.यावेळी पुण्यात ब्राम्हण महासंघाकडून राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या कार्यालयासमोर अमोल मिटकरींच्या विधानाचा निषेध करण्यासाठी आंदोलन केलं आहे.;
राष्ट्रवादी कॉंग्रेसचे (NCP)आमदार अमोल मिटकरी (Amol mitkari) यांनी सांगलीच्या इस्लामपूर येथील सभेत केलंलं भाषण सध्या चर्चेत आहे.मिटकरींनी ब्राम्हण समाजाच्या भावना दुखावल्याचा आरोप करत ब्राम्हण समाज आक्रमक झाला आहे.यावेळी पुण्यात ब्राम्हण महासंघाकडून राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या कार्यालयासमोर अमोल मिटकरींच्या विधानाचा निषेध करण्यासाठी आंदोलन केलं आहे.
सांगलीतल्या सभेत बोलताना मिटकरींनी भाषणात बोलताना एक किस्सा सांगितला होता. एका ठिकाणी मी गेलो. कन्यादान होत होतं. मी म्हटलं अन्नदान ऐकलं, नेत्रदान ऐकलं, रक्तदान ऐकलं. कन्या काय दान करण्याचा विषय असतो का? म्हणे असतो ना. नवरदेव पीएचडी, नवरी एमए झाली. लग्न लावणारे महाराज म्हणत होते तुमचा हात, तुमच्या पत्नीचा हात माझ्या हातात द्या. मम भार्या समर्पयामी. मी नवरदेवाच्या कानात सांगितलं आरे येड्या, ते महाराज म्हणतायत मम म्हणजे माझी भार्या म्हणजे बायको आणि समर्पयामी म्हणजे घेऊन जा. आरारारा… बहुजन कधी सुधरणार? असं मिटकरी म्हणाले होते.
या विधानामुळे ब्राम्हण समाजाच्या भावना दुखावल्या गेल्याने मिटकरींनी माफी मागावी,अशी मागणी करण्यात आली आहे. मात्र अमोल मिटकरी यांनी माफी मागणार नसल्याचं म्हटलं आहे.
ज्यांनी माझ्यावर आरोप केलेत, त्यांनी माझा व्हिडीओ पूर्णपणे तपासावा. मी कोणत्याही समाजाचं नाव घेतलेलं नाही. मी एका गावात कन्यादान सुरू असताना तिथे विरोध केला. कन्या हा काही दान करण्याचा विषय नाहीये. कन्यादान करत असताना स्थानिक महाराजांनी जो मंत्र उच्चार केला, त्याचा अर्थ फक्त समजावून सांगितला. यांनी त्याला वेगळा जातीय किंवा राजकीय रंग देण्याचं काम करू नये. माझ्या विधानाचा विपर्यास करण्याचं काम विरोधकांकडून होतंय. माझा पूर्ण व्हिडीओ पाहावा. त्यात कोणत्याही समाजाबद्दल कोणताही अपशब्द वापरला गेलेला नाही, असं मिटकरी म्हणाले
आपल्या राज्याचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (Governer bhagat singh koshyari)महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुलेंबद्दल जे बोलले, त्यावर तुम्ही काही बोलले नाही. मी राजकारणात नंतर आहे, माझा पिंड समाजकारणाचा आहे. राजमाता जिजाऊंची राजा शिवछत्रपतीमध्ये जी बदनामी केली गेली, यावर या लोकांनी माफी मागावी. त्यानंतर मी माफी मागायला तयार आहे, असं मिटकरी म्हणाले.