नवाब मलिक यांचे अंडरवर्ल्डशी संबंध: देवेंद्र फडणवीस यांचे गंभीर आरोप
Nawab Malik’s Son Bought Land From Blast Convict, Claims Fadnavis;
Nawab Malik's Son Bought Land From Blast Convict, Claims Fadnavisआर्यन खान प्रकरणात दररोज नवनवीन माहिती देत NCB च्या अधिकाऱ्यांसह भाजपवर निशाणा साधणाऱ्या नवाब मलिक यांच्यावर आज देवेंद्र फडणवीस यांनी गंभीर आरोप केले आहे. देवेंद्र फडणवीस यांनी दिवाळीच्या अगोदर 'नवाब मलिक यांनी लवंगी फटाका फोडला असला, तरी दिवाळीनंतर बॉम्ब मी फोडेन.' असं म्हणत देवेंद्र फडणवीस यांनी आज पत्रकार परिषद घेत नवाब मलिक यांचे अंडरवर्ल्डशी संबंध असल्याचा आरोप केला आहे.
राष्ट्राच्या सुरक्षेशी निगडीत मुद्दा उपस्थित करणार असल्याचं सांगत फडणवीस यांनी 1993 मुंबई बॉंम्ब ब्लास्ट प्रकरणातील आरोपींकडून नवाब मलिक यांनी जमीन खरेदी केल्याचा गंभीर आरोप केला असून फडणवीस यांनी मुंबईच्या हत्यारांकडून जमीन विकत का घेतली? असा सवाल नवाब मलिक यांना केला असून आज त्यांनी या संदर्भात पुरावे सादर केले आहेत. हे पुरावे आपण शरद पवार यांना देणार असल्याचं फडणवीस यांनी म्हटलं आहे.
पाहा काय म्हटलंय फडणवीस यांनी