राज्यात मोठ्या राजकीय घडामोडी, पृथ्वीराज चव्हाण दिल्लीत…

Update: 2022-02-24 08:32 GMT

राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांना ED ने 3 मार्चपर्यंत कोठडी सुनावली आहे. नवाब मलिक यांना अटक झाल्यानंतर महाविकास आघाडीच्या नेत्यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. राष्ट्रवादीच्या वतीने राज्यभरात आंदोलन केली जात आहेत. भाजपच्या विरोधात राज्यात निदर्शन केली जात आहे. एकीकडे या सगळ्या घडामोडी घडत असताना माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण सध्या दिल्लीत आहेत.

महाविकास आघाडी सरकार सत्तेत आल्यापासून राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या प्रत्येकी एका मंत्र्याला राजीनामा द्यावा लागला आहे. आणि नवाब मलिक यांना देखील या प्रकरणात कदाचित राजीनामा द्यायला लागू शकतो. या सगळ्या घडामोडी घडत असताना पृथ्वीराज चव्हाण दिल्लीत आहेत.

महाविकास आघाडीचं सरकार तयार होताना पृथ्वीराज चव्हाण यांची मोठी भूमिका राहीलेली आहे. चव्हाण यांनीच दिल्ली येथे न्यायालयीन लढाई लढली होती. मात्र, प्रत्यक्ष सत्ता स्थापन झाल्यानंतर चव्हाण यांना महाविकासआघाडी सरकारमध्ये स्थान देण्यात आले नव्हते. त्यामुळे राज्यातील सर्व घडामोडींच्या पार्श्वभूमीवर चव्हाण यांचा दिल्ली दौरा महत्त्वाचा मानला जात आहे. चव्हाण कदाचित काँग्रेस हायकमांडची भेट घेऊन राज्यातील महाविकास आघाडी सरकारचा इतिवृत्तांत मांडणार असल्याचं समजतं.

आगामी काळात महाविकास आघाडी सरकारमध्ये काही मंत्र्यांना राजीनामा देऊन नवीन लोकांना संधी दिली जाणार आहे. असं बोललं जात आहे. या मंत्रिमंडळ फेरबदलात चव्हाण यांना संधी दिली जाणार का? हा सवाल देखील उपस्थित केला जात आहे.

त्यातच राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात विधानसभा अध्यक्षाची निवडणूक पार पडणार आहे. विधानसभा अध्यक्षाचा तिढा अद्यापपर्यंत सुटलेला नाही. विधानसभा अध्यक्ष पद काँग्रेस कडे आहे आणि विधानसभा उपाध्यक्ष पद राष्ट्रवादी काँग्रेसकडे आहे. विधानसभा अध्यक्ष पद रिक्त असल्याने उपाध्यक्षांकडेच कामकाज आहे. त्यामुळं राष्ट्रवादी काँग्रेस विधानसभा अध्यक्ष पदाची निवडणूक घेण्यास फारशी उत्सुक नाही. असं बोललं जात आहे. त्यामुळं या निवडणूकीत विधानसभा अध्यक्षाची निवडणूक घेण्यात यावी. यासाठी थेट दिल्लीतून दबाव आणला जाण्याची शक्यता आहे. या सर्व पार्श्वभूमीवर पृथ्वीराज चव्हाण यांचा दिल्ली दौरा महत्वाचा मानला जात आहें

Tags:    

Similar News