राज्यसभा निवडणूक : नवाब मलिक आणि अनिल देशमुख यांना मतदानासाठी जामीन मिळणार का? उच्च न्यायालयात तातडीची सुनावणी
राज्यसभा निवडणूकीत मतदानाला काही तास उरले आहेत. यापार्श्वभुमीवर मुंबई सत्र न्यायालयाने मोठा निकाल दिला आहे. या निर्णयामुळे महाविकास आघाडीला मोठा धक्का मानला जात आहे. त्यामुळे अनिल देशमुख आणि नवाब मलिक यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली आहे.;
राज्यसभा निवडणूकीत मतदानाला काही तास शिल्लक आहेत. यापार्श्वभुमीवर मुंबई सत्र न्यायालयाने अनिल देशमुख आणि नवाब मलिक यांना मतदानासाठी जामीन देण्यास नकार दिला आहे. त्यामुळे अनिल देशमुख आणि नवाब मलिक हे उच्च न्यायालयात गेले आहेत. तर त्यांच्या जामीनावर तातडीने सुनावणी होणार आहे.
राज्यसभा निवडणूकीत भाजप विरुध्द शिवसेना संघर्ष रंगला आहे. त्यापार्श्वभुमीवर महाविकास आघाडीने एकतेचा नारा दिला आहे. मात्र राष्ट्रवादी काँग्रेसचे अटकेत असलेले माजी गृहमंत्री अनिल देशमुख आणि मंत्री नवाब मलिक यांना राज्यसभा निवडणूकीत मतदान करता येणार नसल्याचा निर्णय मुंबई सत्र न्यायालयाने दिला आहे. त्यामुळे अनिल देशमुख आणि नवाब मलिक उच्च न्यायालयात गेले आहेत. त्यामुळे आज होणाऱ्या राज्यसभा निवडणूकीत अनिल देशमुख आणि नवाब मलिक यांना मतदानाची संधी मिळणार की नाही? याचा फैसला होणार आहे. मात्र उच्च न्यायालयाने देशमुख आणि मलिक यांचा जामीन अर्ज फेटाळल्यास राज्यसभा निवडणूकीतील विजयी उमेदवारांच्या मतांचे गणितही बदलणार आहे. त्यामुळे त्याचा फटका महाविकास आघाडीला बसण्याची शक्यता आहे.
जामीन न मिळाल्यास काय असणार समीकरण
राज्यसभा निवडणूकीत एक मताची किंमत ही 100 असते. तर एकूण विधानसभा सदस्यांची संख्या भागिले राज्यसभेच्या राज्यासाठी असलेल्या जागा यामध्ये एक मिळवून त्याचे गणित काढले जाते.
285 ×100/6+1 = 40.71
राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अनिल देशमुख आणि नवाब मलिक यांना मतदानासाठी जामीन न मिळाल्यास 40.71 म्हणजेच विजयी होण्यासाठी उमेदवाराला 41 मतांची आवश्यकता आहे. त्यामुळे जो उमेदवाराला 41 सदस्य मतदान करतील तो उमेदवार राज्यसभेत पोहचणार आहे.
सध्याचे मतांचे गणित
सध्या भाजपचे एकूण 106 आमदार आहेत. तर राष्ट्रवादी काँग्रेसचे 53, शिवसेना 56 आणि काँग्रेसचे 44 आमदार आहेत. तर राज्यात इतर छोटे घटकपक्ष आणि अपक्ष मिळून 29 आमदार आहेत. त्यामुळे राज्यातील महत्वाच्या असलेल्या राज्यसभेच्या सहाव्या जागेसाठी अपक्षांची भुमिका महत्वाची ठरणार आहे.
राज्यसभेचे उमेदवार
राज्यसभा निवडणूकीसाठी भाजपने केंद्रीय मंत्री असलेले पियुष गोयल, अनिल बोंडे आणि धनंजय महाडिक यांना संधी दिली आहे. तर राष्ट्रवादी काँग्रेसने राष्ट्रीय पातळीवरील नेते प्रफुल्ल पटेल यांना संधी दिली आहे. याबरोबरच काँग्रेसने इम्रान प्रतापगढी यांना संधी दिली आहे. यर शिवसेनेकडून संजय राऊत तसेच संजय पवार या निवडणूकीत उभे आहेत. मात्र भाजपचे संख्याबळ पाहता २ जागा सहज निवडून येऊ शकतात. तर राष्ट्रवादी, काँग्रेस आणि शिवसेनेची एक जागा सहज निवडून येऊ शकते. मात्र या निवडणूकीत सहाव्या जागेसाठी कोणत्याही पक्षाकडे अपेक्षित संख्याबळ नव्हते. मात्र तरीही भाजपने धनंजय महाडिक यांना तर शिवसेनेने संजय पवार यांना या जागेवर उभा केले आहे. त्यामुळे ही जागा चुरशीची ठरणार आहे.
भाजपकडे 106 आणि अपक्षांच्या समर्थनासह 113 आमदार आहेत. तर दुसरीकडे महाविकास आघाडी 169 सदस्यांचे समर्थन असल्याचे सांगत आहे. मात्र आजच्या निवडणूकीत कोण बाजी मारणार हे चित्र सायंकाळी स्पष्ट होणार आहे. त्यामुळे या निवडणूकीकडे संपुर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.